VHT 2025 : अंतिम सामन्यात कर्नाटक आणि विदर्भ भिडणार, कधी आणि कुठे पाहाता येणार सामना?
विजय हजारे स्पर्धेच्या थरार आता अंतिम फेरीत पोहोचला आहे. साखळी फेरीनंतर उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत मात देत कर्नाटक आणि विदर्भ हे दोन संघ अंतिम फेरीत पोहोचले आहेत. या सामन्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. चला जाणून घेऊयात हा सामना कधी आणि कुठे पाहता येईल ते..

विजय हजारे स्पर्धेचा गेल्या महिन्याभरापासून थरार सुरु होता. या स्पर्धेत कर्नाटक आणि विदर्भ संघाने जबरदस्त कामगिरी करत अंतिम फेरी गाठली आहे. करूण नायरच्या नेतृत्वात विदर्भाने, तर मयंक अग्रवालच्या नेतृत्वात कर्नाटकने अंतिम फेरी गाठली आहे. कर्नाटकने उपांत्य फेरीत हरियाणाला, तर विदर्भाने महाराष्ट्राला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेत करूण नायरचा जबरदस्त फॉर्म पाहिला गेला आहे. त्यामुळे त्याची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड होण्याची दाट शक्यता आहे. नायरने 112, 44, 163, 111, 112, 122 आणि 88 धावा केल्या आहेत. यात फक्त तो एकदाच बाद झाला आहे. मागच्या सात डावात फलंदाजी करताना त्याने 752 धावा केल्या आहेत. “स्वप्न नेहमी देशासाठी खेळण्याचे असते. त्यामुळे हो, स्वप्न अजूनही जिवंत आहे. त्यामुळेच आम्ही हा खेळ खेळत आहोत. देशासाठी खेळणे हे एकच ध्येय आहे,” असं करुण नायरने पीटीआयशी बोलताना सांगितलं.
कर्नाटक विरुद्ध विदर्भ विजय हजारे ट्रॉफी फायनल किती वाजता होणार आहे?
कर्नाटक विरुद्ध विदर्भ विजय हजारे ट्रॉफी फायनल शनिवारी भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 पासून सुरू होईल.
कर्नाटक विरुद्ध विदर्भ विजय हजारे ट्रॉफी फायनल सामना कधी आणि कुठे पाहायचा?
कर्नाटक विरुद्ध विदर्भ विजय हजारे ट्रॉफी अंतिम सामना JioCinema ॲप आणि वेबसाइटवर पाहता येईल आणि Sports18 नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. तर प्रत्यक्ष मैदानात पाहायचा असल्यास वडोदराच्या कोटंबी स्टेडियमवर जावं लागेल.
दोन्ही संघाचे प्लेयर्स
विदर्भ : करुण नायर (कर्णधार), नचिकेत भुते, शुभम दुबे, हर्ष दुबे, प्रफुल्ल हिंगे, यश कदम, अमन मोखाडे, दर्शन नळकांडे, यश राठोड, पार्थ रेखडे, जितेश शर्मा, ध्रुव शौरे, अथर्व तायडे, आदित्य ठाकरे, अक्षय वाडकर, अपूर्व वानखेडे, यश ठाकूर
कर्नाटक: मयंक अग्रवाल (कर्णदार), श्रेयस गोपाल (उपकर्णधार), अभिलाष शेट्टी, केव्ही अनीश, किशन बेदारे, मनोज भंडागे, प्रवीण दुबे, हार्दिक राज, व्ही कौशिक, अभिनव मनोहर, निकिन जोस, विद्याधर पाटील, केएल श्रीजीथ, लवनीथ सिसोदिया, आर स्मरण, विजयकुमार विशक.
