VHT : विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य फेरीचे चारही संघ ठरले, जाणून घ्या कधी आणि केव्हा सामने ते
विजय हजारे ट्रॉफी 2025-26 उपांत्यपूर्व फेरीचे सामने पार पडले असून उपांत्य फेरीचे चारही संघ ठरले आहेत. त्यामुळे आता अंतिम फेरीत चार पैकी कोणते संघ धडक मारतात याची उत्सुकता आहे. चला जाणून उपांत्य फेरीच्या सामन्यांबाबत...

Vijay Hazare Trophy 2025-26 Semifinalist: विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. तीन सामन्यानंतर जेतेपदाचा मानकरी कळणार आहे. उपांत्यपूर्व फेरीचे सामने नुकतेच पार पडले. या स्पर्धेतून चार संघ आऊट, तर चार संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. 12 जानेवारीला कर्नाटक आणि सौराष्ट्रने उपांत्य फेरीत धडक मारली होती. 13 जानेवारीला आणखी दोन संघांनी उपांत्य फेरी गाठला आहे. पंजाब आणि विदर्भ संघाची वर्णी उपांत्य फेरीत लागली आहे. त्यामुळे उपांत्य फेरीच्या लढती स्पष्ट झाल्या आहेत. पहिल्या उपांत्य फेरीत कर्नाटक आणि विदर्भ आमनेसामने येणार आहेत. तर दुसऱ्या उपांत्य फेरीत पंजाब आणि सौराष्ट्र यांच्यात लढत होणार आहे. हे दोन्ही सामने बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेन्स ग्राउंड 1 मध्ये होणार आहेत.
पंजाब विरुद्ध मध्य प्रदेश
पंजाबचा मध्य प्रदेश संघावर भारी पडला. प्रथम फलंदाजी करताना 6 गडी गमवून 345 धावा केल्या. तसेच विजयासाठी 346 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना मध्य प्रदेशचा डाव कोसळला. मध्य प्रदेशला फक्त 162 धावांपर्यंत मजल मारता आली. हा सामना पंजाबने 183 धावांनी जिंकला. या सामन्यासाठी सामनावीराचा पुरस्कार प्रभसिमरन सिंगला मिळाला. त्याने 86 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकार मारत 88 धावांची खेळी केली.
विदर्भाने दिल्लीला नमवलं
उपांत्यपूर्व फेरीची लढत विदर्भ आणि दिल्ली संघात झाली. या सामन्यात विदर्भाने दिल्लीला लोळवलं. विदर्भने प्रथम फलंदाजी करताना 300 धावांचा पल्ला गाठला. या धावांचा पाठलाग करताना दिल्लीला फक्त 224 धावांपर्यंत मजल मारता आली. 45.1 षटकात सर्व गडी गमावले. हा सामना विदर्भाने 76 धावांनी जिंकला. या सामन्यासाठी सामनावीराचा पुरस्कार यश राठोडला मिळाला. त्याने 73 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकार मारत 86 धावा केल्या.
विजय हजारे ट्रॉफीचे सामने कुठे पाहता येतील?
विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य फेरीचे सामने चाहत्यांना पाहता येणार आहे. त्याचं प्रसारण स्टार स्पोर्ट्सवर केलं जाणार आहे. इतकंच काय डिजिटल प्लॅटफॉर्म जिओहॉटस्टारही सामने पाहता येणार आहेत.
उपांत्य फेरीचे सामने
- 15 जानेवारी 2026, कर्नाटक विरुद्ध विदर्भ, बंगळुरु
- 16 जानेवारी 2026, सौराष्ट्र विरूद्ध पंजाब, बंगळुरु
- 18 जानेवारी 2026, अंतिम सामना, बंगळुरु
