AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VHT 2026 PUN vs MP : पंजाबची उपांत्य फेरीत धडक, मध्य प्रदेशचा 183 धावांनी दारूण पराभव

विजय हजारे ट्रॉफी 2025-26 स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पंजाब आणि मध्य प्रदेश हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात पंजाबने 183 धावांनी मध्य प्रदेशला लोळवलं. या विजयासह उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

VHT 2026 PUN vs MP : पंजाबची उपांत्य फेरीत धडक, मध्य प्रदेशचा 183 धावांनी दारूण पराभव
VHT 2026 PUN vs MP : पंजाबची उपांत्य फेरीत धडक, मध्य प्रदेशचा 183 धावांनी दारूण पराभवImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Jan 13, 2026 | 6:42 PM
Share

विजय हजारे ट्रॉफी 2025-26 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. उपांत्यपूर्व फेरीचे सामने पार पडले आहेत. पंजाब आणि मध्य प्रदेश यांच्यात उपांत्यपूर्व फेरीची लढत झाली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल मध्य प्रदेशच्या बाजूने लागला. पण प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय मात्र फसला. कारण पंजाबने प्रथम फलंदाजी करत त्याचा पुरेपूर फायदा घेतला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 गडी गमवून 345 धावा केल्या. तसेच विजयासाठी 346 धावांचं आव्हान दिलं. पण हे आव्हान गाठताना मध्य प्रदेशचा 31.2 षटकात 162 धावा करू शकला. पंजाबने हा सामना 183 धावांनी जिंकला आणि उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत पंजाबचा सामना सौराष्ट्रशी होणार आहे. हा सामना 16 जानेवारीला होणार आहे. या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत पोहोचेल. अंतिम फेरीचा सामना 18 जानेवारीला होणार आहे.

पंजाबकडून हरनूर सिंग आणि प्रभसिमरन सिंग यांनी चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी केली. पहिल्या विकेसाठी मध्य प्रदेशला 22 षटकापर्यंत वाट पाहावी लागली.हरनूर सिंग 51 धावा करून बाद झाला. त्यानंतर प्रभसिमरन सिंग आणि अनमोलप्रीत सिंग यांनी डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी या दोघांनी 39 धावांची भागीदारी केली. अनमोलप्रीत सिंग आणि नमन धीर यांच्यात 44 धावांची भागीदारी, अनमोलप्रीत आणि नेहल वढेरा यांच्यात 76 धावांची भागीदारी, अनमोलप्रीत सिंग आणि रमनदीप यांच्यात 36 धावांची भागीदारी, तर सनवीर सिंग आणि रमनदीप सिंग यांच्यात 34 धावांची भागीदारी झाली. प्रभसिमरन सिंगने 86 चेंडूत 88, अनमोलप्रीत सिंगने 62 चेंडूत 70, नेहल वढेराने 38 चेंडूत 56 धावा केल्या. मध्य प्रदेशकडून त्रिपुरेश सिंगने 2, वेंकटेश अय्यरने 2, आर्यन पांडेने 1 आणि कुलदीप सेनने 1 गडी बाद केला.

पंजाबने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना मध्य प्रदेशचा डाव पत्त्यासारखा कोसळला. अवघ्या 162 धावांवर सर्व गडी बाद झाले. यश दुबे 3, हिमांशु मंत्री 18, शुभम शर्मा 24, रजत पाटीदार 38, वेंकटेश अय्यर 0, सारांश जैन 6, त्रिपुरेश सिंग 31, आर्यन पांडे 13, कुमार कार्तिकेय 0 अशा धावा करून बाद झाले. पंजाबकडून सनवीर सिंगने 3, गुरनूर ब्रारने 2, कृष भगत 2, रमनदीप सिंग 2 आणि मयंक मार्केंडेयने 1 विकेट घेतली.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी