AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iyer vs Kohli: विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्यात ‘फाईट’, खरं काय ते जाणून घ्या

IND vs NZ : भारताच्या वनडे क्रिकेटमधील दोन दिग्गज खेळाडूंमध्ये मैदानात द्वंद्व पाहायला मिळणार आहे. हे दोन्ही खेळाडू दुसरे तिसरे कोणी नसून विराट आणि श्रेयस अय्यर आहेत. नेमकं काय प्रकरण ते जाणून घ्या.

Iyer vs Kohli: विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्यात 'फाईट', खरं काय ते जाणून घ्या
Iyer vs Kohli: विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्यात 'फाईट', खरं काय ते जाणून घ्या Image Credit source: PTI
| Updated on: Jan 13, 2026 | 5:13 PM
Share

India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा वनडे सामना राजकोटमध्ये खेळला जाणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ मालिका खिशात घालण्याच्या प्रयत्नात असेल. हा सामना 14 जानेवारीला दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. तसं पाहीलं तर हा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आहे. पण भारतीय खेळाडूंमध्ये एक द्वंद्व पाहायला मिळेल. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर हे दोन दिग्गज खेळाडू भिडणार आहेत. हे द्वंद्व एकमेकांना मागे टाकण्यासाठी असणार आहे. श्रेयस अय्यर आणि विराट कोहली वनडेतील दिग्गज खेळाडू आहेत. मागच्या 20 वनडे सामन्यातील आकडेवारी पाहिली तर या दोघांचं द्वंद्व पाहायला मिळेल. मागच्या 20 वनडे सामन्यात श्रेयस अय्यर विराट कोहलीपेक्षा वरचढ ठरला आहे. श्रेयसने विराटपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. पण सध्या विराट कोहलीचा फॉर्म पाहता पुढच्या सामन्यात काहीही होऊ शकते.

श्रेयस अय्यरने मागच्या 20 सामन्यात 1030 धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीही या शर्यतीत फार मागे नाही. सध्या विराट कोहली जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने मागच्या 20 डावात 1024 धावा केल्या आहेत. म्हणजेच या दोघांमध्ये फक्त 6 धावांचं अंतर आहे. दुसरीकडे रोहित शर्माही या शर्यतीत कधीही येऊ शकतो. कारण 927 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. आता राजकोटमध्ये कोण पुढे जातं याची उत्सुकता आहे. खरं तर ही शर्यत विराट आणि श्रेयस दरम्यान आहे. आता राजकोटमधील याचा फैसला होणार आहे.

दुसरीकडे, श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी आहे. त्याने राजकोट वनडे सामन्यात 34 धावा केल्या, तर विराट-शिखरला मागे टाकेल. 34 धावा करताच विराट कोहली वनडेत सर्वात वेगाने 3000 धावा करणार फलंदाज ठरेल. शिखर धवनने 72 डावात 3 हजार धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीने 75 डावात हा पल्ला गाठला होता. श्रेयस अय्यरने 69 डावात येथपर्यंत मजल मारली आहे. विशेष म्हणजे श्रेयस अय्यर मधल्या फळीत फलंदाजीला उतरतो. असं असूनही वेगाने 3 हजार धावांच्या टप्प्याजवळ पोहोचला आहे.

50 टक्क्यांचा आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका!
50 टक्क्यांचा आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका!.
जिल्हा परिषद निवडणुका कधी? निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर
जिल्हा परिषद निवडणुका कधी? निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर.
अदानी 10 वर्षांत एवढे मोठे कसे झाले?, ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
अदानी 10 वर्षांत एवढे मोठे कसे झाले?, ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल.
जागे रहा! ... तर कानाखाली वाजवा! उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
जागे रहा! ... तर कानाखाली वाजवा! उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित
12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित.
अर्लामवाल्याचं घड्याळ बंद करुन...; भाषणातून फडणवीसांची टोलेबाजी
अर्लामवाल्याचं घड्याळ बंद करुन...; भाषणातून फडणवीसांची टोलेबाजी.
धर्माच्या नावावर लढत आहेत; नितेश राणेंची विरोधकांवर टीका
धर्माच्या नावावर लढत आहेत; नितेश राणेंची विरोधकांवर टीका.
हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा पेटला, मनसे आक्रमक, भाजपला गंभीर इशारा
हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा पेटला, मनसे आक्रमक, भाजपला गंभीर इशारा.
अविनाश जाधव यांच्या याचिकेवर उद्या हायकोर्टात तातडीची सुनावणी
अविनाश जाधव यांच्या याचिकेवर उद्या हायकोर्टात तातडीची सुनावणी.
सोलापुरात भाजपची पळवापळवी टवाळगिरी, प्रणिती शिंदेंची टीका
सोलापुरात भाजपची पळवापळवी टवाळगिरी, प्रणिती शिंदेंची टीका.