AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohali : बाबर आझम-विराट कुणाचा कव्हर ड्राईव्ह सर्वोत्तम? फिंचच्या उत्तराने थांबली फॅन्सची बोलती, असं काय म्हणाला फिंच?

विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांच्यात नेहमीच तुलना होत आली आहे. याशिवाय दोन खेळाडूंमध्ये सर्वोत्तम कव्हर ड्राईव्ह कोण करतो, हा नेहमी चर्चेचा विषय असतो. यावर एक चाहत्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचला प्रश्न विचारला. त्यावर फिंच काय म्हणला वाचा...

Virat Kohali : बाबर आझम-विराट कुणाचा कव्हर ड्राईव्ह सर्वोत्तम? फिंचच्या उत्तराने थांबली फॅन्सची बोलती, असं काय म्हणाला फिंच?
विराट कोहली, बाबर आझमImage Credit source: social
| Edited By: | Updated on: Apr 14, 2022 | 3:41 PM
Share

दिल्ली : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat kohli) आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (babar azam) यांच्यात नेहमीच तुलना होत आली आहे. या दोघांसंदर्भात कोणताही मुद्दा असला की नेटकरी दोघांची तुलना करु लागतात. कोण कसं दुसऱ्यापेक्षा मोठं आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न दोन्ही खेळाडूंच्या चाहत्यांकडून केला जातो. बाबर आझमने विराट कोहलीचे अनेक मोठे विक्रमही मोडले आहेत. याशिवाय दोन खेळाडूंमध्ये सर्वोत्तम कव्हर ड्राईव्ह कोण करतो, हा नेहमी चर्चेचा विषय असतो. जगातील सर्व दिग्गज खेळाडू विराट कोहलीला जगातील सर्वोत्तम फलंदाज आणि कव्हर ड्राईव्ह स्पेशल खेळाडू मानतात. मात्र आता हा प्रश्न ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचसमोर (Aaron Finch) आला आहे. आता दोघात तिसरा आल्यावर काय होतं, हे तुम्हला चांगलंच माहीत आहे. बाबर आझम आणि विराट कोहली यांच्यात होणारी तुलना काही नवीन नाही, या दोघांमध्ये नेटकरी अनेक गोष्टींवरुन तुलना करतात. त्यातच आता पुन्हा एकदा या दोघांमध्ये तुलना सुरु झाली आहे. या दोघांच्या भांडणात तिसरा फिंच देखील आला आहे.

चाहत्याचा फिंच थेट सवाल

चांगला कव्हर ड्राईव्हर कोण, असा प्रश्न केकेआरचा सलामीवीर आरोन फिंचला ट्विटरवर प्रश्नोत्तराच्या सत्रात विचारण्यात आला. केकेआरच्या एका चाहत्याने फिंचला विचारले की, ‘पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम कव्हर ड्राईव्ह शॉट कोणाला वाटतो? चाहते आधी काही सेकंद थांबले आणि मग त्यांनी सध्याच्या दोन खेळाडूंची नावे घेतली. फिंच म्हणाला की बाबर आझम आणि विराट कोहली. या दोन्ही खेळाडूंना कव्हर ड्राइव्ह खेळताना पाहणं मला आवडत.

तुम्हाला हे माहिती आहे का?

2021 मध्ये बाबर आझमने त्याचा पाकिस्तानी सहकारी इमाम-उल-हक याच्याशी बोलताना सांगितले की, त्याला दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सकडून कव्हर ड्राईव्ह शॉट खेळण्याची प्रेरणा मिळाली आहे.  जो त्याचा आवडता शॉट आहे. पीसीबीच्या एका व्हिडिओमध्ये त्याने हे सांगितले की. मी यासाठी सुरुवातीपासून खूप मेहनत घेतली आहे, असं आझम त्यावेळी म्हणालात होता. त्यावेळी तो कव्हर ड्राईव्ह ज्या पद्धतीने खेळतो त्याची मी नक्कल करायचो. बाबर आझम पुढे म्हणाला की, मी तिथून सुरुवात केली आणि मग क्रिकेट खेळायला सुरुवात केलं. नेट प्रॅक्टिस 2 वाजता सुरू व्हायची तर 11 वाजता मी पोहोचायचे, अशी आठवन देखील त्याने सांगितलं होती. कव्हर ड्राईव्ह शॉटची नेहमी चर्चा असते. या शॉट्सच्या चर्चेवेळी नोहमी आझम आणि विरोट कोहलीचं नाव आवर्जुन घेतलं जातं.

इतर बातम्या

VIDEO : 50 SuperFast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 14 April 2022

Akola Temperature | अकोला तापमान वाढीवर उपाययोजनांसाठी चिंतन! जिल्हाधिकारी का गठीत करणार तज्ज्ञांची समिती?

VIDEO : Fast News | महत्वाच्या बातम्या | 14 April 2022

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.