AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट-अश्विनची मोठ्या विक्रमावर नजर, पुजारा-रहाणेकडे खास संधी

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. उभय संघांमधील पहिला कसोटी सामना (India vs South africa first test) येत्या 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

IND vs SA : द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट-अश्विनची मोठ्या विक्रमावर नजर, पुजारा-रहाणेकडे खास संधी
Virat Kohli - Rahul Dravid
| Edited By: | Updated on: Dec 20, 2021 | 10:53 PM
Share

जोहान्सबर्ग : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. उभय संघांमधील पहिला कसोटी सामना (India vs South africa first test) येत्या 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर खेळला जाणार आहे. टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे कारण भारताने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कधीही कसोटी मालिका जिंकलेली नाही आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत संघाला मजबूत स्थितीन नेण्यासाठी प्रत्येक सामना जिंकणे आवश्यक आहे. आता दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकायची असेल तर आपल्या खेळाडूंना काहीतरी खास करावंच लागेल. (Virat Kohli, Cheteshwar Pujara, Ajinkya Rahane, Ravichandran Ashwin has chance to complete special milestone in India vs South Africa test series)

विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि रवीचंद्रन अश्विन यासारख्या दिग्गजांकडून टीम इंडियाला खूप अपेक्षा आहेत. या दिग्गजांना दक्षिण आफ्रिकेत काही विशेष कामगिरी करण्याची संधी आहे.

विराट होणार 8 हजार मनसपदार

प्रत्येकजण विराट कोहलीकडून 71 व्या आंतरराष्ट्रीय शतकाची अपेक्षा करत आहे. त्याचबरोबर भारतीय कसोटी कर्णधार त्याच्या 8000 कसोटी धावांपासून फक्त 199 धावा दूर आहे. कोहलीच्या नावावर 97 कसोटींमध्ये 7801 धावा आहेत आणि जर हा अनुभवी खेळाडू मालिकेतील तीनही सामने खेळला तर त्याच्या नावावर 100 कसोटी सामने होतील. चांगली गोष्ट म्हणजे दक्षिण आफ्रिकेत विराट कोहलीची बॅट नेहमीच तळपली आहे. विराटने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर 55.80 च्या सरासरीने 558 धावा केल्या आहेत ज्यात 2 शतकांचा समावेश आहे.

पुजारा-रहाणे 1000 धावा पूर्ण करणार?

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे चांगल्या फॉर्ममध्ये नसले तरी या दोन्ही खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेत विशेष कामगिरी करण्याची संधी आहे. हे दोन्ही खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1000 धावा पूर्ण करण्यापासून फार दूर नाहीत. पुजाराने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 14 कसोटीत 758 धावा केल्या आहेत तर रहाणेने 748 धावा केल्या आहेत.

अश्विन दक्षिण आफ्रिकेतच स्टेनला मागे टाकणार?

आर अश्विनलाही अनेक दिग्गज गोलंदाजांना मागे टाकण्याची संधी असेल. अश्विनने कसोटीत 427 विकेट घेतल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान अश्विन रिचर्ड हेडली, रंगना हेराथ आणि कपिल देव यांसारख्या दिग्गजांना मागे टाकू शकतो. एवढेच नाही तर तो डेल स्टेनच्या 439 विकेट्सपासूनही फार दूर नाही. या मालिकेत त्याने 13 विकेट घेतल्यास तो स्टेनच्या भूमीवरच त्याला मागे टाकू शकतो.

इतर बातम्या

India vs South Africa: पुढचे तीन दिवस महत्त्वाचे, हेड कोच राहुल द्रविड असं का म्हणाले?

India south africa tour: पहिल्या कसोटीत स्टेडियममध्ये प्रेक्षकांमधून ‘इंडिया, इंडिया’चा जयघोष ऐकू येणार नाही, कारण….

IND VS SA : विराट कोहलीचा शतकांचा दुष्काळ संपणार, राहुल द्रविडच्या तालमीत विराटचा सराव

(Virat Kohli, Cheteshwar Pujara, Ajinkya Rahane, Ravichandran Ashwin has chance to complete special milestone in India vs South Africa test series)

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.