Virat Kohli | विराट दशकातील प्रभावशाली आणि महान खेळाडू, सुनील गावसकर यांच्याकडून कोहलीचं कौतुक

विराट कोहलीला आयसीसीकडून एकूण 5 पुरस्करांसाठी नामांकन मिळालं आहे.

Virat Kohli | विराट दशकातील प्रभावशाली आणि महान खेळाडू, सुनील गावसकर यांच्याकडून कोहलीचं कौतुक
Follow us
| Updated on: Dec 10, 2020 | 5:49 PM

सिडनी : टीम इंडियाने 3 टी 20 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियावर 2-1 च्या (India vs Australia 2020-21) फरकाने विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेचा वचपा घेतला. टीम इंडियाने कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात ही कामगिरी केली. तिसऱ्या टी 20 सामन्यात विराटने झुंजार 85 धावांची खेळी केली. विराट या टी 20 मालिकेत टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. विराटने एकूण 3 सामन्यात 140 च्या स्ट्राईक रेटने आणि 44 च्या सरासरीने 134 धावा केल्या. टीम इंडियाचे माजी खेळाडू लिटील मास्टर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी विराटचं कौतुक केलं आहे. virat kohli is the most impactful cricketer in odi of this decade, says sunil gavskar

गावसकर काय म्हणाले?

“विराट  हा या दशकातील एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात प्रभावशाली क्रिकेटपटू आहे. विराटने टीम इंडियाला विजयी आव्हानाचं पाठलाग करताना बहुतांश सामन्यात विजय मिळवून दिला आहे”, असं गावसकर म्हणाले. ते Star Sports च्या एका विशेष कार्यक्रमादरम्यान बोलत होते.

“एखादा खेळाडू किती धावा करतो, मी इतकचं पाहत नाही. तर त्या खेळाडूची ती संबंधित खेळी किती प्रभावशाली तसेच निर्णायक ठरते, याकडेही माझं लक्ष असतं. याच दृष्टीने पाहायचं झालं तर विराट हा दशकातील प्रभावशील खेळाडू राहिला आहे. विराटने टीम इंडियाला अनेक सामन्यात विजय मिळवून दिला आहे”, असंही गावसकर म्हणाले.

विराटला एकूण 5 पुरस्कारांसाठी नामांकन

दरम्यान आयसीसीने काही दिवसांपूर्वीच क्रिकेटमध्ये गेल्या दशकात दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची नामांकन यादी जाहीर केली आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला आयसीसीकडून एकूण 5 पुरस्करांसाठी (ICC Decade Awards) नामांकन मिळालं आहे. यामध्ये दशकातील सर्वोत्तम कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 खेळाडू या पुरस्करासाठी विराटला नामांकन दिलं आहे. तसेच दशकभरात खेळ भावना जपणाऱ्या आणि सर्वश्रेष्ट पुरुष खेळाडू या पुरस्काराचंही नामांकन मिळालं आहे. विराट दशकातील सर्वोत्तम खेळाडू या पुरस्काराचा प्रबळ दावेदार आहे.

संबंधित बातम्या :

ICC Decade Awards | आयसीसी दशकातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू निवडणार, विराट कोहलीला ‘या’ पाच पुरस्कारांसाठी नामांकन

ICC T20I Batting Rankings | विराट आणि केएलची टी 20 मालिकेत शानदार कामगिरी, आयसीसी क्रमवारीत ‘या’ क्रमांकावर झेप

ICC T20 World Cup | “…तर टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत पराभूत होईल”

India vs Australia 2020 | टीम इंडियाला कसोटी मालिकेत विराटची उणीव भासेल : सचिन तेंडुलकर

England Tour India | इंग्लंडच्या भारत दौऱ्याची घोषणा, ‘या’ 3 स्टेडियमध्ये खेळण्यात येणार सामने

virat kohli is the most impactful cricketer in odi of this decade, says sunil gavskar

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.