India vs Australia 2020 | टीम इंडियाला कसोटी मालिकेत विराटची उणीव भासेल : सचिन तेंडुलकर

कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

India vs Australia 2020 | टीम इंडियाला कसोटी मालिकेत विराटची उणीव भासेल : सचिन तेंडुलकर
Follow us
| Updated on: Dec 10, 2020 | 2:47 PM

अॅडिलेड : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर टी 20 मालिकेत  (India Tour Australia 2020-21) 2-1 च्या फरकाने विजय मिळवला. या टी 20 मालिकेनंतर दोन्ही संघात कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. एकूण 4 सामन्यांची ही मालिका असणार आहे.17 डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिल्या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मायदेशी परतणार आहे. यामुळे टीम इंडियाला उर्वरित सामन्यांमध्ये विराटची उणीव भासेल, असं टीम इंडियाचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) म्हणाला. जानेवारी 2021 मध्ये विराट बाबा होणार आहे. विराटच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. या अशा महत्वाच्या वेळेस विराट आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणार आहे. बीसीसीआयनेही त्याला पालक्तवाची रजा मंजूर केली आहे. यामुळे विराट पहिल्या कसोटीनंतर टीम इंडियासाठी उपलब्ध नसेल. India vs Australia 2020-21 sachin tendulkar on virat kohli

सचिन काय म्हणाला?

“विराट पहिल्या सामन्यानंतर भारतात परतेल. त्यामुळे भारतीय संघाला विराटची उणीव भासेल. तसेच विराटची जागा घेणाऱ्या अर्थात नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या खेळाडूसाठी ही सुवर्णसंधी असेल”, असं सचिन म्हणाला. उर्वरित 3 सामन्यांसाठी अजिंक्य रहाणेला कर्णधारपदाची जबाबदारी मिळू शकते.

“टीम इंडियाचे सर्व खेळाडू दमदार आहेत. यामुळे टीम इंडियाला दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी मालिका जिंकण्यास मदत मिळू शकते”, असा आशावादही सचिनने व्यक्त केला. सचिन एएफपीसोबत बोलत होता.

टीम इंडियाचे दमदार खेळाडू

‘टीम इंडियाकडे तोडीस तोड खेळाडू आहेत. ही संघासाठी जमेची बाब आहे. विराटच्या अनुपस्थितीमुळे काही युवा खेळाडूंना खेळण्याची संधी मिळेल”, असंही सचिनने नमूद केलं. भारतीय संघाने मागील दौऱ्यात कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियावर 2-1 च्या फरकाने विजय मिळवला होता. मात्र यावेळेस कडवं आव्हान असणार आहे. मागील दौऱ्यात संघात डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन हे 3 खेळाडू नव्हते. मात्र आता आहेत. जेव्हा आपले महत्वाचे खेळाडू संघात नसतात,तेव्हा त्यांची उणीव भासते. अशीच उणीव ऑस्ट्रेलियाला गेल्या वेळेस भासली होती, असं सचिन म्हणाला.

इयन चॅपलकडून अजिंक्य रहाणेचं कौतुक

ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयन चॅपेल (Ian Chappell) यांनी टीम इंडियाचा फलंदाज अजिंक्य रहाणेचं (Ajinkya Rahane) कौतुक केलं आहे. अजिंक्य मला चांगला कर्णधार वाटतो. तो फार आक्रमक आहे. त्याची ही शैली संघासाठी उपयुक्त ठरेल. चॅपल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगगद्वारे पीटीआयसोबत बोलत होते.

“मार्च 2017 मध्ये धर्मशाळा येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात कसोटी सामना खेळला जात होता. या सामन्यात अजिंक्य टीम इंडियाचे नेतृत्व करत होता. या सामन्यात अजिंक्यने शानदार नेतृत्व केलं. अजिंक्य वास्तवात आक्रमक कर्णधार आहे”, असं चॅपल म्हणाले.

चॅपल यांनी अजिंक्यचा बारीक बारीक गोष्टींचा उल्लेख केला. या सामन्यातील पहिल्या डावात डेव्हिड वॉर्नर मैदानात पाय रोवून उभा होता. यावेळेस अजिंक्यने कुलदीप यादवला गोलंदाजी करण्याची संधी दिली. कुलदीपने अजिंक्यचा विश्वास सार्थ ठरवला. कुलदीपने वॉर्नरला बाद केलं आणि विकेट मिळवून दिला.

आक्रमक फलंदाजी

चॅपल यांनी अजिंक्यचा आणखी एक किस्सा सांगितला. “भारतीय संघ विजयी आव्हानाचं पाठलाग करत होता. भारताने 2 विकेट्स गमावल्या. अजिंक्य मैदानात होता. अजिंक्यने आक्रमक पवित्रा घेतला. त्याने फटकेबाजी केली. त्याची ही आक्रमक शैली मला फार भावली”, असं चॅपल म्हणाले.

“कर्णधार म्हणून तुमच्याकडे दोन पर्याय असतात. एक आक्रमकपणे खेळ करणं किंवा बचावात्मक पद्धतीने खेळणं. कसोटीमध्ये आक्रमकपणे खेळायला हवं. आणि अजिंक्य आक्रमकपणे खेळतो”, असंही चॅपल यांनी नमूद केलं.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अ‌ॅडलेड दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अ‌ॅडलेड तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज.

संबंधित बातम्या :

ICC T20I Batting Rankings | विराट आणि केएलची टी 20 मालिकेत शानदार कामगिरी, आयसीसी क्रमवारीत ‘या’ क्रमांकावर झेप

ICC T20 World Cup | “…तर टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत पराभूत होईल”

India vs Australia 2020-21 sachin tendulkar on virat kohli

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.