विराट कोहली नागपूर कसोटी आधी मोठ्या टेन्शनमध्ये, ट्विट करत दिली माहिती

हरिश मालुसरे, Tv9 मराठी

|

Updated on: Feb 07, 2023 | 8:34 PM

युवा खेळाडूंसाठी कायम प्रेरणास्थान असलेला विराट कोहली नाराज झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका सुरू होण्याआधी असं काय झालं की कोहली टेन्शनमध्ये आला आहे.

विराट कोहली नागपूर कसोटी आधी मोठ्या टेन्शनमध्ये, ट्विट करत दिली माहिती
virat kohli

मुंबई : बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या कसोटी मालिकेला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. दोन्ही संघ तयारीला लागले असून कसोटी मालिका खिशात घालण्यासाठी कांगारू प्लॅन करत आहेत. मात्र त्याआधी भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीला मोठा धक्का बसला आहे. विराट कोहली हताश झाला असून त्याने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. युवा खेळाडूंसाठी कायम प्रेरणास्थान असलेला विराट कोहली नाराज झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका सुरू होण्याआधी असं काय झालं की कोहली दु: खी झाला आहे.

नेमकं काय घडलं? नागपूर कसोटीआधी विराट कोहलीचा नवा कोरा मोबाईल हरवला आहे फोन हरवल्यामुळे कोहली नाराज आहे. कारण कोहलीने त्या फोनचा बॉक्सही उघडला नव्हता आणि मोबाईल हरवला आहे. कोहलीने ट्विटमध्ये, तुमचा नवीन फोन जो अनबॉक्स करण्याआधीच हरवला जातो. यापेक्षा मोठं दु:ख नसून माझा नवीन फोन कोणी पाहिला आहे का? असं म्हटलं आहे.

आपण नवीन फोन असो किंवा दुसरी एखादी वस्तु ती तुम्ही घेतलीत आणि अनबॉक्स करण्याआधीच गहाळ झाली. त्यानंतर जे काही दु:ख होत याची आपण कल्पना करू शकत नाही. कोहली नाराज झाल्यामुळे याचा त्याच्या खेळावर काही परिणाम तर होणार नाही याची चिंता चाहत्यांना लागली आहे.

नागपूरमध्ये कसोटीमध्ये पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. विराट कोहली भारताचा महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. कोहलीसह टीम इंडियाचे बाकीचे खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकण्यासाठी तयारी करत आहेत. सरावावेळी कोहलीने स्वीप आणि रिव्हर्स या दोन शॉटवर कसून सराव केला आहे. कांगारूंच्या मैदानांवर खेळताना विराटने मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. मात्र तशीच कामगिरी भारतात करण्याचा विराटचा प्रयत्न असणार आहे.

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेच्या जोरावर भारत कसोटी विश्वचषकाच्या क्रमवारीत आपलं स्थान भक्कम करणार आहे. भारताला चार सामन्यांमधील किमान तीन सामने जिंकावे लागणार आहेत.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI