दुबईत समुद्र किनाऱ्यावर Virat kohli ने दाखवले सिक्स पॅक्स ॲब्स, पहा VIDEO
आशिया कप (Asia cup) 2022 च्या लीग राऊंड मध्ये दोन सामने जिंकल्यानंतर आता टीम इंडिया (Team india) सुपर-4 मध्ये दाखल झाली आहे.

मुंबई: आशिया कप (Asia cup) 2022 च्या लीग राऊंड मध्ये दोन सामने जिंकल्यानंतर आता टीम इंडिया (Team india) सुपर-4 मध्ये दाखल झाली आहे. टीम इंडियाचा पुढचा सामना रविवारी होणार आहे. हा सामना पाकिस्तान विरुद्ध (IND vs PAK) होऊ शकतो. यासाठी पाकिस्तानला हाँगकाँगला हरवावं लागेल. टीम इंडिया रविवारच्या सामन्याआधी रिलॅक्स मूड मध्ये दिसली. भारतीय खेळाडू गुरुवारी दुबईत समुद्र किनारी फिरण्यासाठी गेले होते. यावेळी विराट कोहलीचे सिक्स पॅक्स ॲब्स पहायला मिळाले.
दुबईच्या बीचवर रिलॅक्स
टीम इंडिया गुरुवारी दुबईच्या बीचवर रिलॅक्स झाली. खेळाडूंनी समुद्रात सर्फिंग, कायाकिंग केलं. त्याशिवाय खेळाडू व्हॉलीबॉलही खेळले. विराट कोहलीने सफेद शॉर्ट्स घालून बीचवर आला होता. यावेळी विराटचे सिक्स पॅक्स ॲब्स पहायला मिळाले. विराट कोहली फिटनेसला खूप महत्त्व देतो.
When #TeamIndia hit ?.?.?.?.?.?! ?
Time for some surf, sand & beach volley! ?#AsiaCup2022 pic.twitter.com/cm3znX7Ll4
— BCCI (@BCCI) September 2, 2022
रोहित शर्माने काय केलं?
कॅप्टन रोहित शर्माने कायाकिंगचा आनंद घेतला. जाडेजा, अश्विन आणि युजवेंद्र चहलही मौजमस्ती करताना दिसले. अशा सेशन्समुळे टीम अजून जवळ येते, त्यांच्यात बाँडिंग घट्ट होतं, असं युजवेंद्र चहलने बीसीसीआय टीव्हीला सांगितलं.
Fun time for Indian players. pic.twitter.com/sZEu8mt610
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 2, 2022
टीम इंडिया फॉर्ममध्ये
टीम इंडिया सध्या विजयाच्या लाटेवर स्वार आहे. पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 विकेटने हरवलं. त्यानंतर हाँगकाँगवर 40 धावांनी विजय मिळवला. भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पंड्याने पाकिस्तान विरुद्ध कमालीचा खेळ दाखवला होता. जाडेजानेही चांगली फटकेबाजी केली. हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवची सुद्धा फटकेबाजी पहायला मिळाली. विराट कोहलीने सुद्धा नाबाद अर्धशतक झळकावलं होतं.
