रोहित शर्माची बॅटिंग पाहून विराट कोहली बघतच राहिला, म्हणाला आज काहीच बोलू नका

रोहित शर्माची (Rohit Sharma) भारतीय टीमच्या (Team India) कॅप्टन पदावर निवड करण्यात आली आहे. विराट कोहलीकडील (Virat Kohli) जबाबदारी रोहित शर्माला देण्यात आली आहे.

रोहित शर्माची बॅटिंग पाहून विराट कोहली बघतच राहिला, म्हणाला आज काहीच बोलू नका
विराट कोहली
Follow us
| Updated on: Dec 13, 2021 | 1:19 PM

नवी दिल्ली: रोहित शर्माची (Rohit Sharma) भारतीय टीमच्या (Team India) कॅप्टन पदावर निवड करण्यात आली आहे. विराट कोहलीकडील (Virat Kohli) जबाबदारी रोहित शर्माला देण्यात आली आहे. यानंतर माध्यमात तर्क वितर्क लढवण्यात येत आहेत. अनेक माध्यमांमध्ये वादाच्या बातम्या दिल्या जात आहेत. विराट कोहलीला न सांगता रोहित शर्माला कर्णधार पद देण्यात आल्याच्या बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या आहेत. आयसीसी चॅम्पियनशिपचं विजेतेपद मिळवण्यासाठ रोहित शर्मावर भरवसा ठेवण्यात आला आहे. रोहित शर्मानं विराट कोहलीला टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू असल्याचं म्हटलं आहे.

गेल्या काही वर्षांपूर्वी एका मुलखतीत विराट कोहलीनं रोहित शर्मासंदर्भात एक अनुभव सांगितला आहे. रोहित शर्मा हा मजेशीर व्यक्ती असल्याचं विराट कोहली म्हणाला होता. विराट कोहलीनं यापूर्वी रोहित शर्माला पहिल्यांदा खेळताना पाहिलं त्यावेळी ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स अशी प्रतिक्रिया असल्याचं म्हटलं आहे.

विराट कोहली काय म्हणाला?

रोहित शर्माच्या सुरुवातीच्या दिवसात आम्हाला त्याच्याबद्दल मोठी उत्सुकता असायची. सर्व लोक एक प्लेअर येत असल्याचं लोक बदलत होते. एक प्लेअर येत आहे , त्याच्या बद्दल मोठी उत्सुकता होती आम्ही पण युवा खेळाडू होतो, पण एक खेळाडू येत आहे तो कोण आहे यासंदर्भात चर्चा होत नव्हती, असं विराट कोहली म्हणाले.

ती गोष्ट 2007 च्या टी 20 वर्ल्ड कप मधील होती. मी त्याला बॅटिंग करातना पाहिल आणि सोफ्यावर बसलो. मी ठरवलं आज पासून काही बोलायचं नाही. लोक त्याच्याबद्दल का चर्चा करायचे हे त्यावेळी समजलं, असं विराट कोहली म्हणाला. त्याची बॅटिंग जबरदस्त आहे. मी त्याच्या सारखा योग्य टायमिंग असणारा खेळाडू पाहिला नसल्याचं विराट कोहली म्हणाला होता.

रोहित विसराळू?

रोहित शर्मा हा विसराळू असल्याचही विराट कोहलीनं यापूर्वी सांगितलं होतं. तो कित्येकदा त्याचं साहित्य हॉटेलमध्ये विसरून जातो. कधी कधी इअर फोन, फोन, पासपोर्ट देखील तो विसरतो, मात्र तो क्रिकेटचं साहित्य कधीच विसरत नाही, असंही विराट कोहली म्हणाला होता. तर, इतर लोकांच्या तुलनेत विराट कोहलीकडे दीड मिनिटं जास्त असतात, असं विराट कोहली म्हणाला.

इतर बातम्या

Yuvraj singh : 40 व्या वाढदिवसादिवशी युवराजची मोठी घोषणा, घेऊन येणार NFT

Team india : दक्षिण आफ्रीका दौऱ्यात या युवा खेळाडुंना संधी मिळणार, तर यांना बाहेरचा रस्ता

Virat Kohli share his first experience of Rohit Sharma batting in 2007 world cup

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.