AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidarbha Pro T20 League : 1 ओव्हरमध्ये 33 रन्स, फलंदाजाचं वादळी शतक, पहिल्याच सामन्यात धमाका

Vidarbha Premier League 2026: विदर्भ प्रीमियर लीग 2026 स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना षटकार-चौकारांचा पाऊस पाहायला मिळाला. तसेच या सामन्यात एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रमही झाला.

Vidarbha Pro T20 League : 1 ओव्हरमध्ये 33 रन्स, फलंदाजाचं वादळी शतक, पहिल्याच सामन्यात धमाका
VPL 2026Image Credit source: PTI
| Updated on: Jun 02, 2026 | 10:18 PM
Share

आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमाची यशस्वी सांगता झाली. मात्र त्यानंतरही टी 20 क्रिकेट लीगचा थरार सुरुच आहे. मुंबई टी 20 लीग आणि विदर्भ प्रो टी20 लीग स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात झाली आहे. या टी 20 लीग स्पर्धेत अनेक स्टार खेळाडू सहभागी झाले आहेत. विदर्भ प्रो टी20 लीग स्पर्धेतील सलामीच्या सामन्यातच क्रिकेट चाहत्यांना धमाका पाहायला मिळाला. सलामीच्या सामन्यात एनईसीओ मास्टर ब्लास्टर्स विरुद्ध पगारिया स्ट्रायकर्स आमनेसामने होते. आयपीएल स्पर्धेत आरसीबीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गोलंदाजाची विदर्भ प्रो टी20 लीग 2026 स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात जोरदार धुलाई करण्यात आली आहे. आरसीबीसाठी 7 सामने खेळून 6 विकेट्स मिळवणाऱ्या गोलंदाजाने विदर्भ प्रो टी20 लीग स्पर्धेत इतक्या धावा दिल्या की रेकॉर्ड झाला.

पगारिया स्टायकर्स टीमने मोसमातील सलामीच्या सामन्यात एनईसीओ मास्टर ब्लास्टर्सचा 5 विकेट्सने धुव्वा उडवला. रवीकुमार समर्थ हा पगारिया स्टायकर्सच्या विजयाचा हिरो ठरला. रवीकुमार याने पहिल्याच सामन्यात झंझावाती शतक झळकावलं.

एकाच षटकात 33 धावा, तुषार कडूचा झंझावात

एनईसीओ मास्टर ब्लास्टर्सने 200 पार मजल मारली. एनईसीओ मास्टर ब्लास्टर्सने टीमने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 219 धावा केल्या. तुषार कडू याने टीमला 219 धावांपर्यंत पोहचवण्यात प्रमुख भूमिका बजावली. तुषारने फक्त 26 चेंडूत 87 धावा ठोकल्या. तुषारने या दरम्यान 87 पैकी 80 धावा 15 चेंडूत केल्या. तुषारने 10 षटकार आणि 5 चौकार लगावले. तसेच तुषारने या दरम्यान एका ओव्हरमध्ये 33 धावा ठोकल्या. तुषार यासह स्पर्धेच्या इतिहासात एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला.

तुषारने डावातील सहाव्या ओव्हरमध्ये 4 सिक्स, 2 फोर आणि सिंगलसह एकूण 33 धावा केल्या. तुषारने स्वप्निल सिंग याने टाकलेल्या ओव्हरमध्ये ही विक्रमी कामगिरी केली. स्वप्निलने आयपीएल स्पर्धेत आरसीबीचं प्रतिनिधित्व केलं आहे. स्वप्निलने 2024 साली आयपीएल स्पर्धेत आरसीबीकडून खेळताना 7 सामन्यांत 6 विकेट्स मिळवल्या होत्या.

पगरिया स्ट्रायकर्सची विजयी सलामी

दरम्यान रवीकुमार याने केलेल्या शतकाच्या जोरावर पगरिया स्ट्रायकर्सने जबरदस्त विजय मिळवला. पगरिया स्ट्रायकर्सने 220 धावांचं आव्हान हे 7 बॉलआधी पूर्ण केलं. पगरिया स्ट्रायकर्सने 18.5 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 223 धावा केल्या. रवीकुमार याने फक्त 55 बॉलमध्ये नॉट आऊट 101 रन्स केल्या आणि टीमला जिंकवलं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...