माजी कसोटीपटू वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, पुढच्या 2 वर्षांसाठी ‘या’ संघाचा मुख्य प्रशिक्षक!

पुढच्या 2 वर्षांसाठी ओडिशा क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक वसीम जाफर असेल. 2 वर्षांसाठी त्याच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे. (Wasim jaffer Became Odisha Cricket team For next 2 year Domestic Season)

माजी कसोटीपटू वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, पुढच्या 2 वर्षांसाठी 'या' संघाचा मुख्य प्रशिक्षक!
Wasim Jaffer

मुंबई : आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ओळखला जाणारा भारताचा माजी कसोटीपटू सलामीवीर वसीम जाफरवर (Wasim Jaffer) मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. तो आता नव्या रोलमध्ये दिसणार आहे. येणाऱ्या देशांतर्गत मोसमात ओडिशा संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी ओडिशा क्रिकेट असोसिएशनने जाफरच्या खांद्यावर दिली आहे.

जाफरसोबत 2 वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट

पुढच्या 2 वर्षांसाठी ओडिशा क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक वसीम जाफर असेल. 2 वर्षांसाठी त्याच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे. ओडिशा क्रिकेट सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे. रश्मि रंजन परीदा यांच्या जागा जाफर घेणार आहे, जे दोन सिझन संघासोबत होते, अशी माहिती ओडिशा क्रिकेट असोसिएनचे सीईओ सुब्रत बहेडा यांनी दिली आहे.

पाठीमागच्या वर्षी उत्तरखंडचा कोच

सर्व वयोगटातील क्रिकेट विकासाव्यतिरिक्त जाफर राज्यातील प्रशिक्षक विकास कार्यक्रमातही सहभागी होणार आहे, अशी माहिती सुब्रत बहेडा यांनी दिली. मार्च २०२० मध्ये सेवानिवृत्तीनंतर त्यांने उत्तराखंड संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली पण असोसिएशनशी झालेल्या वादानंतर त्यांने राजीनामा दिला.

प्रथम श्रेणी क्रिकेटमधला लिजेंड

प्रथम श्रेणी क्रिकेटचा बादशाह आणि टीम इंडियाचा माजी सलामीवीर अशी जाफरची ओळख आहे. वसीम जाफरने 260 प्रथम श्रेणी मॅचेस खेळल्या आहेत. यामध्ये 19410 रन्स त्याने ठोकले आहेत. यात 314 हा त्याचा सर्वाधिक स्कोअर होता. 50.7 च्या सरासरीने 57 शतके आणि 91 अर्धशतकं त्याने झळकावली आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमधला तो लिजेंड मानला जातो.

जाफर भारताकडून 31 कसोटी सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 1944 धावा केल्या आहेत. शिवाय दोन वन डे सामन्यातही जाफर भारताकडून खेळला आहे. वासिम जाफरने 2000 मध्ये आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केलं. शेवटची कसोटी तो 2008 मध्ये खेळला.

दहा रणजी फायनल खेळाला, सर्व सामने जिंकले

2019 साली विदर्भ संघाने रणजी चषकावर नाव कोरलं होतं. त्यावेळी वासिम जाफर विदर्भकडून खेळला होता. नागपुरात विदर्भ संघाने जिंकलेली ही रणजी ट्रॉफी वसिम जाफरच्या कारकीर्दीतली दहावी ट्रॉफी ठरली. 42 वर्षी वसिम जाफरचा हा दहावा रणजी अंतिम सामना होता आणि या सर्व सामन्यांमध्ये त्याला विजयाचा साक्षीदार होता आलं. त्याने 2015/16 पर्यंत मुंबईकडून खेळताना आठ वेळा रणजी चॅम्पियन होण्याचा मान मिळवला होता.

वसिम जाफरने या विक्रमासोबत सर्वाधिक वेळा चॅम्पियन होण्याचा मनोहर हर्दिकर आणि दिलीप सरदेसाई यांचा विक्रमही मोडला. या दोन्ही दिग्गज खेळाडूंनीही प्रत्येकी 10 वेळा रणजी ट्रॉफी जिंकली होती. या यादीत वसिम जाफरच्या पुढे अजित वाडेकर (11) आणि अशोक मंकड (12) यांचा क्रमांक लागतो.

(Wasim jaffer Became Odisha Cricket team For next 2 year Domestic Season)

हे ही वाचा :

जय श्रीरामच्या घोषणा रोखल्या, मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य, वासिम जाफरवर गंभीर आरोप

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI