AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS: टीम इंडियाचा पराभव, ऑस्ट्रेलिया 45 धावांनी विजयी

India A Women vs Australia A Womens Unoffical Test Match Result: ऑस्ट्रेलिया ए वूमन्सने टीम इंडिया ए वूमन्स टीमवर टी20, वनडे सीरिजनंतर एकमेव कसोटी सामन्यातही कुरघोडी करत विजय मिळवला.

IND vs AUS: टीम इंडियाचा पराभव, ऑस्ट्रेलिया 45 धावांनी विजयी
aus vs ind womens a unofficial test
| Updated on: Aug 25, 2024 | 5:58 PM
Share

ऑस्ट्रेलिया वूमन्स ए विरूद्धच्या एकमेव अनऑफिशियल 4 दिवसीय कसोटी सामन्यात टीम इंडिया वूमन्स एचा 45 धावांनी पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 289 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाचा दुसरा डाव हा 92.5 ओव्हरमध्ये 243 धावांवर आटोपला. टीम इंडियाने तिसऱ्या दिवसाचा खेळसंपेपर्यंत 6 विकेट्स गमावून 68 ओव्हरमध्ये 149 धावा केल्या होत्या. त्यामुळे चौथ्या आणि अखेरच्या दिवशी विजयासाठी आणखी 140 धावांची गरज होती. तर ऑस्ट्रेलियाला 4 विकेट्स हव्या होत्या. मात्र टीम इंडियाला चौथ्या दिवशी 4 विकेट्स गमावून 95 धावाच करता आल्या.

टीम इंडियाचा दुसरा डाव

टीम इंडियाकडून दुसर्‍या डावात विकेटकीपर उमा चेत्री हीने सर्वाधिक धावा केल्या. उमाने 80 बॉलमध्ये 47 रन्स केल्या. शुभा सतीशने 45 धावा केल्या. ओपनर प्रिया पुनिया 36 धावा करुन माघारी परतली. राघवी बिष्ट हीने 26 धावांची खेळी केली. श्वेता सेहरावत आणि सायली सातघरे या दोघींनी प्रत्येकी 21-21 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन मिन्नू मणी हीने 10 धावा केल्या. तर इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून चार्ली नॉट आणि टेस फ्लिंटॉफ या दोघींनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. ग्रेस पार्सन्स हीने दोघींना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर लिली मिल्स आणि मॅटलान ब्राउन या दोघींनी 1-1 विकेट घेतली.

टीम इंडिया अपयशी

दरम्यान टीम इंडिया ए वूमन्स ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अपयशी ठरली. टीम इंडियाला टी 20i मालिकेत 0-3 अशा फरकाने पराभूत व्हावं लागलं. तर ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिकेत 2-1 अशा फरकाने मालिका जिंकली. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाने एकमेव अनऑफिशियल कसोटी सामनाही जिंकला. टीम इंडियाला हा शेवटचा सामना जिंकून शेवट गोड करण्याची संधी होती, मात्र त्यातही कांगारुंनी बाजी मारली.

ऑस्ट्रेलिया ए वूमन्सचा 45 धावांनी विजय

वूमन्स ऑस्ट्रेलिया ए प्लेइंग ईलेव्हन : चार्ली नॉट (कर्णधार), एम्मा डी ब्रो, जॉर्जिया वॉल, निकोल फाल्टम, टेस फ्लिंटॉफ, मॅडी डार्क (विकेटकीपर), मॅटलान ब्राउन, केट पीटरसन, लिली मिल्स, ग्रेस पार्सन्स आणि निकोला हॅनकॉक.

वूमन्स इंडिया ए प्लेइंग ईलेव्हन : मिन्नू मणी (कर्णधार), श्वेता सेहरावत, प्रिया पुनिया, शुभा सतीश, तेजल हसबनीस, बिस्त राघवी, सजीवन सजाना, उमा चेत्री (विकेटकीपर), मन्नत कश्यप, प्रिया मिश्रा आणि सायली सातघरे.

Follow Us
जवळच्या व्यक्तीनेच केला खरातचा गेम! फार्महाऊसवरील नको ते व्हिडीओ गोळा
जवळच्या व्यक्तीनेच केला खरातचा गेम! फार्महाऊसवरील नको ते व्हिडीओ गोळा.
रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक, 'राजा शिवाजी'चि
रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक, 'राजा शिवाजी'चि.
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री..
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका.
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी.
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार.
मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटः 'प्रबुद्ध भारत'च्या संपादकांचा खळबळजनक दावा
मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटः 'प्रबुद्ध भारत'च्या संपादकांचा खळबळजनक दावा.
ठाकरे–फडणवीस गुप्त भेटीच्या चर्चांवर मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण
ठाकरे–फडणवीस गुप्त भेटीच्या चर्चांवर मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण.
ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट, 'अनेक नेते आमच्या संपर्कात, त्यापैकी...'
ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट, 'अनेक नेते आमच्या संपर्कात, त्यापैकी...'.
बागेश्वर बाबाच्या '४ मुले जन्माला घाला' वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस...
बागेश्वर बाबाच्या '४ मुले जन्माला घाला' वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस....