AUS vs IND : कॅप्टन रोहितने लाजिरवाण्या पराभवानंतर सर्व खेळाडूंना सुनावलं, म्हणाला…

Rohit Sharma Post Match AUS vs IND 2nd Test : पहिल्या सामन्यात पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीत पलटवार करत टीम इंडियाला 10 विकेट्सने लोळवलं. टीम इंडियाचा हा पराभव कर्णधार रोहित शर्मा याच्या जिव्हारी लागला आहे.

AUS vs IND : कॅप्टन रोहितने लाजिरवाण्या पराभवानंतर सर्व खेळाडूंना सुनावलं, म्हणाला...
Isa Guha and Rohit Sharma Post Match
Follow us
| Updated on: Dec 08, 2024 | 12:31 PM

बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील अ‍ॅडलेडमध्ये खेळवण्यात आलेल्या दुसर्‍या पिंक बॉल टेस्ट मॅचचा निकाल तिसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रातच लागला. ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्स याच्या नेतृत्वात टीम इंडियाचा 10 विकेट्सने खुर्दा उडवला. ऑस्ट्रेलियाच्या सलामी जोडीनेच विजयासाठी मिळालेलं 19 धावांचं आव्हान सहज पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने या विजयासह पर्थमधील पराभवाचा वचपा घेत मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. ऑस्ट्रेलियाचा हा पिंक बॉल टेस्टमधील एकूण 13 पैकी 12 वा विजय ठरला. तसेच ऑस्ट्रेलियाने अ‍ॅडलेडमध्ये पिंक बॉलने आपला दबदबा कायम ठेवला. ऑस्ट्रेलियाने अ‍ॅडलेडमध्ये पिंक बॉलने खेळलेले सर्व सामने जिंकलेत. ऑस्ट्रेलियाचा हा अ‍ॅडलेडमधील आठवा विजय ठरला. या लाजिरनवाण्या पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने काय म्हटलं? जाणून घेऊयात.

रोहित शर्मा काय म्हणाला?

“आमच्यासाठी हा आठवडा फार निराशाजनक राहिला.आम्ही जिंकायच्या लायकीचं (तोडीचं) खेळू शकलो नाहीत. ऑस्ट्रेलिया आमच्यापेक्षा चांगला खेळला. सामन्यात आम्हाला कमबॅक करण्याची संधी होती. मात्र आम्ही त्या संधीचा फायदा घेऊ शकलो नाहीत. आम्ही त्या संधीचा फायदा घेण्यात अपयशी ठरलो आणि त्याची किंमत आम्हाला मोजवी लागली. आम्ही पर्थमध्ये जे केले ते खूप खास होतं. अ‍ॅडलेडमध्येही आम्हाला पर्थसारखीच कामगिरी करायची होती. मात्र प्रत्येक कसोटी सामन्यात आव्हान वेगवेगळं असतं. पिंक बॉलमुळे आव्हानात्मक असेल हे आम्हाला माहीत होतं”,असं रोहितने पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान म्हटलं.

कॅप्टन रोहितला पराभव जिव्हारी

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, नितीश रेड्डी, रवीचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

वाल्मिक कराडला आर्थर जेलमध्ये ठेवा, दमानियांची मागणी, तर जरांगे म्हणता
वाल्मिक कराडला आर्थर जेलमध्ये ठेवा, दमानियांची मागणी, तर जरांगे म्हणता.
Saif Ali Khan Attacked : 'सैफवर जीवघेणा हल्ला तर 'तो' इतका फिट कसा?'
Saif Ali Khan Attacked : 'सैफवर जीवघेणा हल्ला तर 'तो' इतका फिट कसा?'.
एक अफवा,11 जणांचा मृत्यू, पुष्पकमधून उड्या, दुसऱ्या बाजून ट्रेनन चिरडल
एक अफवा,11 जणांचा मृत्यू, पुष्पकमधून उड्या, दुसऱ्या बाजून ट्रेनन चिरडल.
जळगावात रेल्वे अपघातातील ११ बळी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरु
जळगावात रेल्वे अपघातातील ११ बळी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरु.
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं.
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं.
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.