AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेंडुलकर कुटुंबात शुभमंगल सावधान! सचिनच्या डोक्यावर ‘फेटा’, साराच्या हातावर सजली मेहेंदी, पहा VIDEO

जगातील ग्रेट क्रिकेटपटूंमध्ये सचिन तेंडुलकरचा (Sachin Tenudlkar) समावेश होतो. क्रिकेटच्या (Cricket) मैदानात सचिनची कामगिरीच तशी आहे.

तेंडुलकर कुटुंबात शुभमंगल सावधान! सचिनच्या डोक्यावर 'फेटा', साराच्या हातावर सजली मेहेंदी, पहा VIDEO
sachinImage Credit source: instagram
| Updated on: Aug 10, 2022 | 11:06 AM
Share

मुंबई: जगातील ग्रेट क्रिकेटपटूंमध्ये सचिन तेंडुलकरचा (Sachin Tenudlkar) समावेश होतो. क्रिकेटच्या (Cricket) मैदानात सचिनची कामगिरीच तशी आहे. क्रिकेटच्या मैदानातून निवृत्ती स्वीकारुन सचिनला आता बरीच वर्ष झाली. पण तरीही सचिन आजही आपल्या फॅन्सच्या आजही संपर्कात असतो. त्यासाठी सचिनने सोशल मीडियाची (Social Media) निवड केली आहे. सचिन सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आयुष्यातील घडामोडींबद्दल चाहत्यांना सतत अपडेट देत असतो. अलीकडेच सचिनने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेयर केलाय. त्यात तो डोक्यावर ‘फेटा’ बांधताना दिसतोय. तेंडुलकर कुटुंबातील एका लग्नासाठी सचिनने डोक्यावर ‘फेटा’ बांधला होता.

‘ऑय सचिन कुमार आहे’

सचिन तेंडुलकर डोक्यावर फेटा बांधत असताना, बॅकग्राऊंड मध्ये एका मराठी गाणं सुरु आहे. सचिन तेंडुलकरचा मोठा भाऊ नितीन तेंडुलकरची मुलगी करिष्माचं लग्न होतं. त्यासाठी सचिनने डोक्यावर फेटा बांधला होता. मी माझा मोठा भाऊ नितीन तेंडुलकरची मुलगी करिष्माच्या लग्नाला आलोय, असं सचिनने फेटा बांधतान सांगितलं. सचिनचा एकदम महाराष्ट्रीयन पारंपारिक, देशी लूक चाहत्यांना भरपूर आवडला. त्याच्या व्हिडिओला लाइक करणाऱ्यांमध्ये माजी क्रिकेटपटू युवराज सिंग सुद्धा आहे. ‘ऑय सचिन कुमार आहे’ असं युवराजने त्याच्या कमेंट मध्ये लिहिलं आहे.

साराने इन्स्टाग्राम वर पोस्ट केले फोटो

सचिन शिवाय त्याची मुलगी सारा तेंडुलकर सुद्धा लग्नात देशी लुक मध्ये दिसली. साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यात ती तिच्या हातावर मेहेंदी काढताना दिसतेय. नितीन तेंडुलकर यांची कन्या आणि नवरी मुलगी करिष्मा सुद्धा फोटो मध्ये दिसते. तिच्या हातावर सुद्धा मेहेंदी सजली आहे. संपूर्ण तेंडुलकर कुटुंब या लग्नामुळे उत्साहित दिसलं. या लग्नामध्ये अर्जुन तेंडुलकर कुठे दिसला नाही. इन्स्टाग्राम स्टोरी तो स्टेडियमच्या इंडोर मध्ये सराव करताना दिसतोय.

सचिनला तीन भाऊ-बहिण

सचिनचे वडिल प्राध्यापक होते. सचिनला एकूण तीन भावंडं. नितीन तेंडुलकर चार भावंडांमध्ये सर्वात मोठा. त्यानंतर अजित तेंडुलकर. सचिनला क्रिकेटच्या मैदानात आणण्याचं श्रेय अजित तेंडुलकरला देतात. या तीन भावांमध्ये एक बहिण. सचिनने निवृत्तीच्यावेळी सर्वांचे आभार मानले होते. तिन्ही भावंडांच करीयर मध्ये कसं योगदान आहे, ते सचिनने सांगतलं होतं.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.