AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

11 महिलांवर अत्याचार केल्याचा खेळाडूवर आरोप; क्रिकेट जगतात खळबळ

मोठी बातमी समोर येत आहे. एका बातमीमुळे वेस्ट इंडिज क्रिकेट संघात वादळ निर्माण झालं आहे. ऑस्ट्रेलिया विरोधात टेस्ट सीरीज सुरू असलेल्या वेस्ट इंडिज क्रिकेट टीमच्या एका खेळाडूवर बलात्काराचा आरोप झाला आहे.

11 महिलांवर अत्याचार केल्याचा खेळाडूवर आरोप; क्रिकेट जगतात खळबळ
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 27, 2025 | 6:08 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे. एका बातमीमुळे वेस्ट इंडिज क्रिकेट संघात वादळ निर्माण झालं आहे. ऑस्ट्रेलिया विरोधात टेस्ट सीरीज सुरू असलेल्या वेस्ट इंडिज क्रिकेट टीमच्या एका खेळाडूवर बलात्काराचा आरोप झाला आहे. कॅरेबियन मीडियाच्या एका रिपोर्टनुसार वेस्ट इंडिजच्या एका खेळाडूवर तब्बल 11 वेगवेगळ्या महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप झाला आहे. ज्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा देखील समावेश आहे. या खेळाडूवर आरोप होताच आता वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे, या खेळाडूला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचं बोललं जातं आहे.

प्रकरण दाबल्याचा इंडिज बोर्डवर आरोप

कॅरेबियन न्यूज वेबसाइट ‘काइटर’ नं दिलेल्या वृत्तानुसार हा खेळाडू गयानामध्ये राहातो, या क्रिकेटरवर तब्बल 11 महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या रिपोर्टमध्ये असा देखील दावा करण्यात आला आहे की, हा खेळाडू सध्या टीम वेस्ट इंडिजचा सदस्य आहे, मात्र हे अजून स्पष्ट नाही की तो सध्या ऑस्ट्रेलियाविरोधात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिज संघाकडून सध्या खेळत आहे की नाही? त्यामुळे आता वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे, या प्रकरणाला कथितरित्या दाबल्याचा आरोप क्रिकेट बोर्डावर होत आहे.

दरम्यान या प्रकरणात वेस्ट इंडिजमधील एका चॅनलने वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष किशोर शौलो यांची प्रतिक्रिया देखील प्रसारीत केली आहे. शौलो यांनी या प्रकरणावर बोलणं टाळलं आहे. त्यांनी माहिती देण्यास नकार दिला, सध्या बोर्ड या प्रकरणावर कोणतीही टिप्पणी करू शकत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

दोन वर्षांपासून आरोप

या प्रकरणात एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे की, या खेळाडूवर दोन वर्षांपूर्वीच पहिला आरोप झाला होता, सध्या ही महिला न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. एका कॅरिबियन चॅनलला बोलताना या महिलेच्या वकिलांनी असा दावा केला आहे की, ही महिला मला दोन वर्षांपूर्वी भेटली, तीने आपली व्याथा मला सांगितली. हा खेळाडू 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आलेल्या टीमचा सदस्य होता असा दावा देखील या वकिलाने केला आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.