AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WI vs IND 1st Test Pitch Report | पहिल्या कसोटीसाठी कसा असेल पीच? कोण वर्चस्व गाजवणार? फलंदाज की, गोलंदाज?

WI vs IND 1st Test Pitch Report | टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्धच्या या टेस्ट सीरीजसाठी संघात युवा खेळाडूंना संधी दिली आहे. ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल या दोघांची विशेष चर्चा आहे.

WI vs IND 1st Test Pitch Report | पहिल्या कसोटीसाठी कसा असेल पीच? कोण वर्चस्व गाजवणार? फलंदाज की, गोलंदाज?
Ind vs Wi 1st Test Image Credit source: AFP
| Updated on: Jul 12, 2023 | 3:23 PM
Share

रोसेऊ : टीम इंडिया वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी तयार आहे. बुधवारपासून डॉमिनिका येथे दोन टेस्ट मॅचची सीरीज सुरु होणार आहे. पहिला सामना रोसेऊच्या विंडसर पार्क मैदानावर खेळला जाणार आहे. या मैदानावर 6 वर्षानंतर पहिला कसोटी सामना होणार आहे. 2011 साली या मैदानावर भारत-वेस्ट इंडिजमध्ये पहिला कसोटी सामना खेळला गेला होता. हा सामना ड्रॉ झाला होता. त्यानंतर झालेल्या सर्व सामन्यांचा निकाल लागला.

या टेस्टपासून टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नव्या सायकलला सुरुवात करणर आहे. टीम इंडियाच्या कामगिरीकडे सगळ्यांच लक्ष असणार आहे.

कसा आहे विंडसर पार्कचा पीच?

विंडसर पार्कच्या खेळपट्टीवर स्पिन गोलंदाजांना मदत मिळू शकते. वेस्ट इंडिजचा ऑफ स्पिनर शेन शिलिंगफोर्डच्या नावावर 2 टेस्ट मॅचमध्ये 20 विकेट आहेत. इथे सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत दुसऱ्या नंबरवर देवेंद्र बिशू आणि तिसऱ्या नंबरवर नाथन लायन आहे. या खेळपट्टीकडून स्पिनर्सना मदत मिळेल हे निश्चित आहे. असं झाल्यास अश्विन, जाडेजा आणि अक्षर या तिघांच्या तिकडीला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. या विकेटवर अजूनपर्यंत टेस्टमध्ये कधीही 400 धावांचा स्कोर झालेला नाही. त्यामुळे इथे मोठी धावसंख्या पाहायला मिळण्याची शक्यता कमी आहे.

कसं असेल हवामान?

डॉमिनिकाच्या चारही बाजूला समुद्र आहे. त्यामुळेच इथे चांगला पाऊस पडतो. मॅचचे पाचही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटच्या दिवशी जास्त पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. मॅचचे पाचही दिवस तापमान 27 ते 30 डिग्री दरम्यान रहाण्याची शक्यता आहे. टेस्ट मॅचच्या दृष्टीने हे एक चांगल तापमान मानलं जातं. मधल्यामध्ये पावसाच्या सरी खेळ बिघडवू शकतात.

टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या टेस्टसाठी विंडिज क्रिकेट संघ

क्रॅग ब्रेथवेट (कॅप्टन), जर्मेन ब्लॅकवूड (उपकर्णधार), एलिक अथानाजे, टेगेनारिन चंद्रपॉल, रहकीम कॉर्नवाल, जोशुआ दा सिल्वा, शॅनन गेब्रियल, जेसन होल्डर, अल्जारी जोसेफ, किर्क मॅकेंजी, रेमन रीफर, केमार रोच आणि जोमेल वारिकन. वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.