IND vs WI : भारत वेस्ट इंडिज सामन्यात पाऊस पडला आणि रद्द झाला तर काय? कोण उपांत्य फेरीत?

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीचा सामना भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होत आहे. हा सामना क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढवणारा आहे. कारण या सामन्यातील विजेत्या संघाला उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. तर पराभूत संघाचं पॅकअप होणार आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे.

IND vs WI : भारत वेस्ट इंडिज सामन्यात पाऊस पडला आणि रद्द झाला तर काय? कोण उपांत्य फेरीत?
IND vs WI : भारत वेस्ट इंडिज सामन्यात पाऊस पडला आणि रद्द झाला तर काय? कोण उपांत्य फेरीत?
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 28, 2026 | 5:42 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील शेवटचा सामना भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होत आहे. हा सामना करो या मरोच्या स्थितीत आहे. कारण भारत आणि वेस्ट इंडिज यापैकी विजेत्या संघाला उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे हा सामना किती महत्त्वाचा आहे, हे कळून येतं. हा सामना कोलकात्यातील प्रतिष्ठित ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ उपांत्य फेरीत इंग्लंडशी भिडणार आहे. त्यामुळे भारत वेस्ट इंडिज सामन्याकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून आहेत. सुपर 8 फेरीतील पहिल्या सामन्यात भारताने निराशाजनक कामगिरी केली होती. तर वेस्ट इंडिजने दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा सामना गमवल्याने उपांत्य फेरीचं गणित या सामन्यावर आलं आहे. त्यामुळे या दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना गमावला आहे. तर एका सामन्यात विजय मिळवला आहे. दोन्ही संघाचे प्रत्येकी 2 गुण आहेत. पण या सामन्यात पाऊस पडला आणि सामना रद्द झाला तर उपांत्य फेरीचं तिकीट कोणाला मिळणार?

भारत वेस्ट इंडिज सामना रद्द झाला तर…

भारत वेस्ट इंडिज सामन्यात पाऊस पडला आणि सामना रद्द करण्याची वेळ आली तर काय? हा सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळेल. त्यामुळे दोन्ही संघांचे प्रत्येकी 3 गुण होतील. अशा स्थितीत नेट रनरेटच्या आधारावर उपांत्य फेरीचा संघ ठरवला जाईल. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींचा हिरमोड होऊ शकतो. कारण वेस्ट इंडिजचा नेट रनरेट हा भारतापेक्षा चांगला आहे. वेस्ट इंडिजचे सध्या 2 गुण आणि नेट रनरेट हा +1.791 आहे. तर भारताचे 2 गुण आणि नेट रनरेट हा -0.100 इतका आहे. त्यामुळ वेस्ट इंडिजला फायदा होईल. भारताने दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा सामना 76 धावांनी गमवला होता. तर झिम्बाब्वेविरुद्ध 72 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे नेट रनरेट काही सुधारता आला नाही. त्यामुळे या सामन्यात पाऊस पडू नये आणि सामना व्हावा अशी प्रार्थना क्रीडाप्रेमी करत आहेत.

कोलकात्यात कसं असेल हवामान?

भारतीय क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी म्हणजे रविवारी पाऊस पडणार नाही. कोलकात्यात दिवसा सूर्यप्रकाश आणि निरभ्र आकाश असेल. संध्याकाळीही पावसाची शक्यता नाही. तर तापमान 34 अंश सेल्सिअस असेल. सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे आणि नाणेफेकी संध्याकाळी 6.30 वाजता होईल. सध्या पावसाची शक्यता नाही. म्हणजेच ईडन गार्डन्सवर पूर्ण सामना होईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us