भारतीय संघ एका पाठोपाठ एक सामने गमवण्याचं कारण काय? भारतीय प्रशिक्षकाने स्पष्ट केलं

भारताने आयर्लंडविरुद्धची टी20 मालिका 2-0 ने गमावली. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत एक सामना गमावला आहे. त्यामुळे टीम इंडियावर टीका होत आहे. असं असताना भारतीय संघावर वारंवार सामने गमवण्याची वेळ का आली आहे? याबाबत फलंदाज प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी स्पष्ट सांगितलं.

भारतीय संघ एका पाठोपाठ एक सामने गमवण्याचं कारण काय? भारतीय प्रशिक्षकाने स्पष्ट केलं
भारतीय संघ एका पाठोपाठ एक सामने गमवण्याचं कारण काय? भारतीय प्रशिक्षकाने स्पष्ट केलं
Image Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Jul 06, 2026 | 10:46 PM

भारतीय संघाने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. त्यानंतर भारतीय संघाचा आयर्लंडविरुद्ध पहिला टी20 मालिका दौरा होता. या मालिकेत भारताला क्लिन स्विप मिळाला. दोन सामन्यांची टी20 मालिका भारताने 0-2 ने गमावली. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतही सुरूवात काही खास झाली नाही. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. तर दुसरा सामना इंग्लंडने जिंकला आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाची सद्यस्थिती पाहता या मालिकेतही काही खरं नाही असंच वाटत आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं जिंकणाऱ्या संघाची स्थिती इतकी वाईट कशी झाली? हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. याचं उत्तर टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी दिलं आहे.

काय म्हणाले सितांशु कोटक?

तिसऱ्या टी20 सामन्यापूर्वी सितांशु कोटक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, जेव्हा संघात बदल होतो तेव्हा अशा गोष्टी होऊ शकतात. सितांशु कोटक म्हणाले की, ‘गेल्या दोन वर्षांत आम्ही एकही मालिका हरलेलो नाही. आम्ही टी20 विश्वचषक, आशिया कप जिंकला. दोन-तीन सामने हरल्यानंतर अनेक जण म्हणू लागले की संघ हरत आहे. हा खेळाचा नियम आहे. कधीकधी, जेव्हा बदल होतो. कर्णधार बदलतो, हार्दिक संघात नसतो, आणि तुम्ही तीन-चार तरुण खेळाडूंना संधी देता, तेव्हा अशा गोष्टी घडू शकतात. तरीही, असे व्हायला नको, पण खेळात असे घडते. पण भारतीय संघ प्रयत्न करत राहील.’

हार्दिक पांड्याची उणीव

टीम इंडियाला अष्टपैलू हार्दिक पांड्याची उणीव भासत असल्याचं फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी मान्य केलं. कोटक म्हणाले की, नितीश कुमार रेड्डीला संधी दिली होती. पण तो दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे सूर्यांश शेडगेवर जबाबदारी टाकली गेली. खेळाडू सामने खेळत असू की नसू 15 खेळाडूंच्या चमूत राहून बरंच काही शिकतो. सितांशु कोटक यांनी पुढे सांगितलं की, टीम इंडिया फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात सुधारणा करेल. टीम इंडिया पुढचा वर्ल्डकप जिंकू इच्छिते आणि यासाठी चांगलं करणं आवश्यक आहे.

Follow Us