IND vs SA : भारत दक्षिण अफ्रिका दुसरा टी20 सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला. आता दुसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. चला जाणून हा सामना कुठे आणि कसा पाहता येईल.

IND vs SA : भारत दक्षिण अफ्रिका दुसरा टी20 सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या सर्वकाही
IND vs SA : भारत दक्षिण अफ्रिका दुसरा टी20 सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या सर्वकाही
Image Credit source: Proteas Men Twitter
| Updated on: Dec 10, 2025 | 8:26 PM

भारताचा टी20 क्रिकेटमध्ये वरचष्मा असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आहे. कसोटी मालिकेत दारूण पराभव आणि वनडे मालिका 2-1 ने जिंकल्यानंतर भारताने टी20 मालिकेची सुरुवात विजयाने केली आहे. पहिल्यात सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेला 74 धावांवर गुंडाळलं आणि हा सामना 101 धावांनी जिंकला. आता दुसऱ्या सामन्यात आणखी एक आघाडी घेण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. तर मालिकेत बरोबरी करण्यासाठी दक्षिण अफ्रिकेचा प्रयत्न असणार आहे. हा सामना कधी होणार आहे? कुठे होणार आहे? किती वाजता सुरू होईल? याबाबतचे सर्व डिटेल्स तुम्हाला पुढे असतील.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा टी20 सामना कधी आहे?

पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी20 सामना 11 डिसेंबर रोजी खेळला जाईल. याचा अर्थ असा की दोन्ही संघ गुरुवारी पुन्हा एकमेकांसमोर येतील.

दुसरा सामना कुठे होणार आहे?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी20 सामना चंदीगड येथे खेळला जाईल. हा सामना मुल्लानपूर येथील पीसीए स्टेडियममध्ये आयोजित केला जाईल.

भारत-दक्षिण आफ्रिका सामना किती वाजता सुरू होईल?

या मालिकेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होतील. नाणेफेक संध्याकाळी 6.30 वाजता होईल.

ते कोणत्या चॅनेलवर थेट प्रक्षेपित केले जाते?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी20 मालिकेतील सर्व सामने स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर थेट प्रक्षेपित केले जातील. याशिवाय, जिओ हॉटस्टार वेबसाइट आणि अॅपवर थेट प्रक्षेपण पाहता येईल.

दोन्ही संघाचे खेळाडू

दक्षिण आफ्रिकेचा टी20 संघ: एडेन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेव्हिस, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, जॉर्ज लिंडे, लुंगी एनगिडी, अँरिक नोकिया, लुथो सिपामला, ट्रिस्टन स्टब्स.

भारताचा टी20 संघ: अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, हार्षित राणा.