AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022, Purple Cap : पर्पल कॅपच्या यादीत कोणता खेळाडू आघाडीवर? तुमचा आवडता खेळाडू नेमका कुठे? जाणून घ्या

आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये काल झालेल्या केकेआर विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या सामन्यात केकेआरने मुंबईवर 52 धावांनी मोठा विजय मिळवला. यानंतर आयपीएलच्या पर्पल कॅपच्या टेबलमध्ये काय बदल झालाय पाहुया...

IPL 2022, Purple Cap : पर्पल कॅपच्या यादीत कोणता खेळाडू आघाडीवर? तुमचा आवडता खेळाडू नेमका कुठे? जाणून घ्या
पर्पल कॅपच्या यादीत पहिल्या क्रमांकावर युझवेंद्र चहल आहे.Image Credit source: BCCI/IPL
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: May 10, 2022 | 7:13 AM
Share

मुंबई : दरवर्षी आयपीएल (IPL 2022) स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. या टेबलमध्ये रोज सामन्यानंतर बदल होत असतो. आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये काल झालेल्या केकेआर (KKR) विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या (MI) सामन्यात केकेआरने मुंबईवर 52 धावांनी मोठा विजय मिळवला. कोलकात्याच्या 166 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा डाव 113 धावात आटोपला. त्यामुळे केकेआरच्या धावगतीत सुद्धा सुधारणा झाली आहे. इशान किशनने 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. पण त्यात T 20 क्रिकेटला साजेसा वेग नव्हता. त्याने 43 चेंडूंमध्ये 51 धावा केल्या. मुंबई इंडियन्सला अपेक्षित सुरुवात मिळाली नाही. कॅप्टन रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. अवघ्या 2 रन्सवर साउदीने रोहितला जॅक्सनकरवी झेलबाद केलं. तिलक वर्माही फार वेळ टिकला नाही. त्याला अवघ्या 6 रन्सवर रसेलने बाद केलं. मागचे दोन सामने मुंबई इंडियन्सला जिंकून देणारा टिम डेविड चमकला नाही. वरुण चक्रवर्तीच्या फिरकीने त्याला चकवलं. डेविडने 9 चेंडूत 13 धावा केल्या. या खेळीत तीन चौकार होते. पॅट कमिन्सने एकाच ओव्हरमध्ये इशान किशन, डॅनियल सॅम्स आणि मुरुगन अश्विन यांच्या विकेट काढल्या. कालच्या केकेआर विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यानंतर पर्पल कॅपच्या यादीत काय बदल झालाय पाहुया…

पर्पल कॅपचा मानकरी कोण?

पर्पल कॅपच्या यादीत पहिल्या क्रमांकावर युझवेंद्र चहल आहे. त्याने सर्वाधिक 22 विकेट आयपीएलच्या या सीजनमध्ये घेतल्या आहेत. दुसऱ्या स्थानी वानिंदू हसरंगा आहे. त्याने 21 विकेट घेतल्या आहेत. तिसऱ्या स्थानी कागिसो रबाडा आहे. त्याने अठरा विकेट आयपीएलच्या या सीजनमध्ये घेतल्या आहेत. चौथ्या स्थानी कुलदीप यादव आहे. त्याने देखील अठरा विकेट आयपीएलच्या या सीजनमध्ये घेतल्या आहेत. पाचव्या स्थानी टी नटराजन आहे. त्याने सतरा विकेट घेतल्या आहेत.

पर्पल कॅपच्या शर्यतीतील टॉप पाच गोलंदाज

गोलंदाज विकेट दिलेल्या धावा
युझवेंद्र चहल26462
वानिंदू हसरंगा 24362
कागिसो रबाडा23406
उमरान मलिक 22444
कुलदीप यादव21419

कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.

केकेआरची टीम सातव्या स्थानावर

KKR ला कालच्या सामन्यात विजय आवश्यक होता. त्यांच्यासाठी हा सामना ‘करो या मरो’ होता. पॉइंटस टेबलमध्ये केकेआरचा संघ नवव्या स्थानावर होता. मुंबई विरुद्धच्या विजयानंतर केकेआरची टीम सातव्या स्थानावर आली आहे. चेन्नईने दिल्ली कॅपिटल्सला नमवल्यानंतर केकेआरची नवव्या स्थानावर घसरण झाली होती. प्लेऑफचं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी केकेआरला कालच्या सामन्यात विजय आवश्यक होता. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना इतर संघांच्या कामगिरीवरही अवलंबून रहाव लागेल. आता दिल्ली, एसआरएच, पंजाब आणि कोलकाता तिन्ही टीम्सचे समान 10 पॉइंटस आहेत.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार