WTC Final 2023 : Ind vs Aus मॅचच्या खेळपट्टीवर होऊ शकतो हल्ला, कुठल्या संघटनेकडून धोका?
WTC Final 2023 : पावसापेक्षा पण या संघटनेकडून Ind vs Aus मॅचला जास्त धोका. 'या' कार्यकर्त्यांनी याआधी अशी अनेक काम केली आहेत, ज्यामुळे मॅचमध्ये गडबड होण्याचा धोका आहे.

लंडन : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आजपासून सुरु होणाऱ्या WTC फायनलमध्ये बाधा उत्पन्न होऊ शकते. आंदोलक मैदानात घुसून तोडफोड करु शकतात. आयसीसीला सुद्धा हीच भिती आहे. म्हणून त्यांनी दोन पीच बनवलेत. दोन्ही टीम्सचे कॅप्टन रोहित शर्मा आणि पॅट कमिन्सने आधीच चिंता व्यक्त केलीय. या आंदोलकांनी स्नूकर चॅम्पियनशिप, फुटबॉल मॅच आणि ब्रिटिश ग्रा पी मध्ये अडथळा आणला आहे. त्यामुळे क्रिकेट मॅचमध्येही हे आंदोलक घुसण्याची भिती आहे.
ब्रिटनच्या रस्त्यावर उतरलेले हे आंदोलक कोण आहेत? हा प्रश्न आहे. हे आंदोलक कधी इंग्लंड क्रिकेट टीमचा मार्ग अडवतात. कधी मोठ्या इवेंट्समध्ये घुसतात. कधी सर्वात मोठा रस्ता M25 वर बैठक घेऊन ट्रॅफीक जॅम करतात.
म्हणून मॅचमध्ये गडबड होण्याचा धोका
आज भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. लंडनच्या ओव्हल मैदानात फायनलचा सामना होईल. ब्रिटनमध्ये मागच्या काही महिन्यांपासून आंदोलन करणारे ‘जस्ट स्टॉप ऑईल’चे कार्यकर्ते यामध्ये बाधा उत्पन्न करु शकतात. आयोजकांनी सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवला आहे. आयसीसीने सुद्धा दोन खेळपट्टया बनवल्यात. ‘जस्ट स्टॉप ऑईल’च्या कार्यकर्त्यांनी याआधी अशी अनेक काम केली आहेत, ज्यामुळे मॅचमध्ये गडबड होण्याचा धोका आहे.
BREAKING: Furious motorists have clashed with Just Stop Oil activists in Gunnersbury and Vauxhall. Click below to read more.
— TalkTV (@TalkTV) June 5, 2023
ही संघटना कोणी बनवलीय?
आपल्या हायप्रोफाईल विरोध प्रदर्शनामुळे ही संघटना मागच्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. जलवायु परिवर्तनासाठी या ग्रुपचे सदस्य देशभर आंदोलन करतायत. ब्रिटनमधील दोन संघटना Extinction Rebeltion आणि Insulate Britain ने मिळून ही संघटना बनवलीय. या संघटनेची मागणी काय?
‘जस्ट स्टॉप ऑईल’चा ब्रिटनमध्ये जीवाश्म इंधन आणि तेलाच्या शोधासाठी दिल्या जाणाऱ्या नव्या लायन्सला विरोध आहे. 2025 पर्यंत कमीत कमी 100 नवे तेल आणि गॅस प्रोजेक्ट सुरु करण्याची ब्रिटीश सरकारची योजना आहे. सरकारने जीवाश्म इंधनाचा प्रयोग बंद करावा आणि रिन्यूएबल एनर्जीसाठी प्रयत्न करावेत, अशी या संघटनेची मागणी आहे.
