AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : यंदाच्या पर्पल कॅपचा मानकरी कोण? हे 4 बोलर्स प्रबळ दावेदार…

आयपीएलमध्ये जसा बॅट्समनचा जलवा पाहायला मिळतो तसाच गोलंदाजांचा देखील दबदबा पाहायला मिळतो. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स मिळवणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप (Purple Cap) दिली जाते. Purple Cap IPL 2021

IPL 2021 : यंदाच्या पर्पल कॅपचा मानकरी कोण? हे 4 बोलर्स प्रबळ दावेदार...
kagiso Rabada
| Updated on: Mar 31, 2021 | 8:18 AM
Share

मुंबईइंडियन प्रीमअर लीगची (IPL 2021) सगळ्या संघांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. भारतीय संघाचे जवळपास सगळे खेळाडू इंग्लंडविरुद्धची मालिका संपवून आयपीएलमधल्या आपापल्या फ्रॅचायझींत दाखल झाले आहेत. संघाचे ट्रेनिंग कॅम्पदेखील सुरु झाले आहेत. आयपीएलचा हंगाम सुरु होण्यास आता फक्त 9 दिवस बाकी आहेत. आयपीएलमध्ये जसा बॅट्समनचा जलवा पाहायला मिळतो तसाच गोलंदाजांचा देखील दबदबा पाहायला मिळतो. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स मिळवणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप (Purple Cap) दिली जाते. यावर्षी पर्पल कॅप कुणाला मिळू शकते?, पर्पल कॅपच्या शर्यतीत कोण आहे, हे आपण पाहूयात… (Who Can Won Purple Cap in IPL 2021)

बुमराह आणि भुवीमध्ये टक्कर

यंदाच्या मोसमात पर्पल कॅप जिंकण्यासाठी भारतीय जलदगती गोलंदाज यॉर्करकिंग जसप्रीत बुमराह आणि स्विंगचा बादशाह भुवनेश्वर कुमार यांच्यात टक्कर पाहायला मिळेल. बुमराहला आंतरराष्ट्रीय स्तरावरचा सर्वोत्तम बोलर मानलं जातं. परंतु आणखी एकाही मोसमात त्याला पर्पल कॅप मिळाली नाही. या वर्षी जोरदार तयारी करत पर्पल कॅप मिळवण्यासाठी तो प्रयत्न करतोय.

दुसरीकडे ड्वेन ब्राव्होसोबत दुसरा खेळाडू आहे ज्याने दोनवेळा पर्पक कॅप नावावर केली आहे तो म्हणजे भुवनेश्वर कुमार. भुवनेश्वरने 2016 आणि 2017 साली दोन वेळा पर्पल कॅप होल्डर होण्याचा मान मिळवलाय. भुवीने आताच इंग्लंडविरुद्ध जोरदार पुनरागमन केलंय. त्याचा फॉर्मही सध्या चांगला आहे.

रबाडा आणि मॉरिस दावेदार

दक्षिण आफ्रिकेचा हुकमी एक्का कागिसो रबाडा यावर्षी आयपीएलच्या पर्पल कॅपचा मानकरी पुरेपुर प्रयत्न करेल. कारण त्याचा सध्या फॉर्मही जोरात आहे. गेल्या हंगामात (IPL 2021) 17 सामन्यांत त्याने 30 विकेट्स घेतल्या. या वर्षीही बॅट्समनचा कर्दनकाळ ठरण्याचा तो प्रयत्न करेल.

दुसरीकडे ख्रिस मॉरिस देखील शानदार अष्टपैलू खेळाडू आहे. यावर्षीच्या ऑक्शनमध्ये मॉरिसला आतापर्यंतच्या आयपीएल इतिसाहात सगळ्यात महाग खरेदी केलंय. त्याच्यासाठी राजस्थान रॉयल्सने 16.25 कोटी रुपये मोजले आहेत. तो ही बॅटबरोबर बॉलने धमाल करण्यास सज्ज झालाय.

(Who Can Won Purple Cap in IPL 2021)

हे ही वाचा :

IPL 2021 : “माही भाईच्या नेतृत्वात खेळणं हा माझ्यासाठी गर्वाचा आणि आनंदाचा क्षण”

IPL 2021 : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणी वाढल्या, हे स्टार खेळाडू पहिली मॅच खेळणार नाहीत!

IPL 2021 : रिषभ पंतच्या पाठीवर रिकी पॉटिंगचा हात, समर्थनार्थ ‘खास बात!’

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.