AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 : कोण आहेत झिम्बाब्वेचे अँडी पायक्रॉफ्ट? यापूर्वी पाकिस्तान खेळाडूंवर पडलेत भारी

आशिया कप 2025 स्पर्धेतील पाकिस्तान युएई सामना रद्द करण्याची वेळ आली होती. भारत पाकिस्तान सामन्यात जे काही घडलं यासाठी झिम्बाब्वेचे सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना जबाबदार धरलं जात होतं. त्यासाठी त्यांना हटवण्याची मागणी पीसीबीने केली होती. पण तसं झालं नाही. पण हे अँडी पायक्रॉफ्ट आहेत तरी कोण?

Asia Cup 2025 : कोण आहेत झिम्बाब्वेचे अँडी पायक्रॉफ्ट? यापूर्वी पाकिस्तान खेळाडूंवर पडलेत भारी
Asia Cup 2025 : कोण आहेत झिम्बाब्वेचे अँडी पायक्रॉफ्ट? यापूर्वी पाकिस्तान खेळाडूंवर पडलेत भारीImage Credit source: Twitter/TV9 malayalam
| Updated on: Sep 17, 2025 | 8:30 PM
Share

सामनाधिकार अँडी पायक्रॉफ्टचं भूत पाकिस्तान संघ आणि पीसीबीच्या मानगुटीवर बसलं असं म्हंटलं तर वावगं ठरणार आहे. कारण आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानने अँडी पायक्रॉफ्ट यांचा मुद्दा उचलत नाटकी सुरु केली होती. पुढच्या सामन्यात सामनाधिकारी असतील तर खेळणार नाही वगैरे वगैरे.. यासाठी पाकिस्ताने एकदा नाही तर दोनदा आयसीसीला पत्र लिहिलं. पण दोन्ही वेळेस त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवली. यामुळे पाकिस्तान संघ आणि पीसीबीची लाज गेली. त्यामुळे सामना खेळणार नाही असा पवित्रा घेतला. पण नंतर पुन्हा एकदा सामना खेळण्याची तयारी दाखवली. हा सामना आता एक तास उशिराने सुरु झाला आहे. पण या संपूर्ण घडामोडींमध्ये पाकिस्तानने अँडी पायक्रॉफ्ट यांना खलनायक दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण तसं झालं नाही. अँडी पायक्रॉफ्ट यापूर्वी पाकिस्तानी खेळाडूंवर भारी पडले आहेत. त्यामुळे ते नेमके कोण आहेत? यापूर्वी कसं काय केलं होतं? ते सर्व जाणून घ्या.

कोण आहेत अँडी पायक्रॉफ्ट?

अँडी पायक्रॉफ्ट हे झिम्बाब्वेसाठी तीन कसोटी आणि 20 वनडे सामने खेळले आहेत. त्यांनी या काळात एकूण 447 धावा केल्या. त्यांचं क्रिकेट करिअर काही खास राहिलं नाही. पण पायक्रॉफ्ट 2009 पासून आयसीसीच्या एलीट पॅनेलचा भाग झाले. यावेळी त्याने 103 कसोटी, 248 वनडे आणि 183 टी20 सामन्यात सामनाधिकाऱ्याची भूमिका बजावली. इतका अनुभव गाठिशी असल्याने आयसीसीतील दिग्गज अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. त्यामुळेत त्यांना आशिया कप 2025 स्पर्धेत सामनाधिकारी म्हणून घोषित करण्यात आलं होतं.

काय झालं होतं यापूर्वी पाकिस्तान संघासोबत?

पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील क्रिकेट वैर जुनंच आहे. दुबळ्या समजल्या जाणाऱ्या झिम्बाब्वेने अनेकदा पाकिस्तानला पराभूत केलं आहे. त्यात अँडी पायक्रॉफ्ट यांनी पाकिस्तानी खेळाडूंवर कारवाई केली आहे. अँडीने सईद अजमल आणि मोहम्मद हाफीज यांच्या गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेतला होता. तसेच त्यांची शैली अवैध घोषित केली होती. त्यामुळे पाकिस्तान आणि अँडी पायक्रॉफ्ट यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. केपटाउन टेस्ट 2018 मध्ये अँडी पायक्रॉफ्ट सामनाधिकारी होते. तेव्हा त्यांनी स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरून बॅनक्रॉफ्ट यांना चेंडूसोबत छेडछाड केल्याप्रकरणी दोषी धरत कारवाई केली होती.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.