AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Who is Nikhil Sosale : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणातील अटकेतील निखिल सोसाले कोण?; अनुष्का शर्माशी कनेक्शन काय?

बंगळुरूतील आरसीबीच्या विजय मिरवणुकीतील दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरसीबीच्या मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाले याला अटक करण्यात आली आहे. सोसालेवर मिरवणुकीचे नियोजन चुकीचे केल्याचा आरोप आहे. त्यांना मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असताना विमानतळावर अटक करण्यात आली.

Who is Nikhil Sosale : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणातील अटकेतील निखिल सोसाले कोण?; अनुष्का शर्माशी कनेक्शन काय?
Nikhil SosaleImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 06, 2025 | 2:08 PM
Share

Who is Nikhil Sosale : आयपीएल 2025मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चॅम्पियन ठरल्यानंतर बंगळुरूत विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सर्वात पहिली अटक करण्यात आली आहे. निखिल सोसाले याला अटक करण्यात आली आहे. निखिल हा आरसीबीच्या मार्केटिंग टीमचा हेड आहे. त्यामुळे त्याला पोलिसांनी अटक केली असून त्याची कसून चौकशी करण्यात आली आहे. निखिल सोसाले याला अटक झाल्यानंतर तो कोण आहे? याची चर्चा रंगली आहे.

आरोप काय?

निखिल सोसालेवर या परेडबाबतचा मोठा आरोप ठेवण्यात आला आहे. व्हिक्ट्री परेड इव्हेंटची त्याने प्लानिंग नीट केली नाही. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यासोबतच दुसरी इव्हेंट कंपनी DNA च्या तीन कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत. निष्काळजीपणामुळेच हे बळी गेल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

निखिल सोसाले याला विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. तो मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत होता. तो एअरपोर्टवर पोहचताच पोलिसांनी त्याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली जात आहे. त्याने या इव्हेंटचं प्लानिंग किती केलं होतं? खरोखरच प्लानिंग होतं की नव्हतं? याची माहिती पोलीस घेत आहेत.

कोण आहे निखिल?

निखिल सोसाले हा इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025च्या बहुतेक सामन्यात प्रेक्षक गॅलरीत विराट कोहलीची बायको अनुष्का शर्मासोबत सावलीसारखा दिसला होता. आयपीएलच्या या सीजनमध्ये अनुष्कावर जेव्हा जेव्हा कॅमेऱ्याचा फोकस गेला तेव्हा तेव्हा निखिल हा अनुष्कासोबत दिसला.

आयपीएलच्या फायनलमध्ये बंगळुरू टीम चॅम्पियन बनल्यावर निखिल सोसाले हा मैदानावर अनुष्कासोबत दिसला. निखिलच्या इन्स्टाग्रामवर विराट कोहली, अनुष्का शर्मासह साक्षी धोनी, युजवेंद्र चहल, दीपिका पल्लीकल, ट्रेव्हिस हेड, जहीर खान, हेजल कीच ( युवराज सिंगची बायको), फाफ डुप्लेसिस, सुरेश रैना आदी मोठे स्टार फॉलो करतात.

त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार त्याचा जन्म 18 ऑगस्ट 1986 रोजी झालाय. गेल्या दोन वर्षापासून तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा मार्केटिंग आणि रेव्हेन्यू हेड आहे. सोसाले हा डियाजिओ इंडिया (DIAGEO India) चा गेल्या 13 वर्षापासूनचा कर्मचारी आहे. यूनायटेड स्पिरिट्स लिमिटेड (USL)ची संचलन ही कंपनी करते.

आरसीबीचे हक्क आधी विजय माल्याकडे होते. पण माल्या देशातून फरार झाल्यानंतर आरसीबीची सर्व जबाबदारी यूएसएलकडे आली. आरसीबीचा बिझनेस पार्टनरशीप हेड म्हणूनही निखिलने काम पाहिलं आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड येथील जेम्स कुक यूनिव्हर्सिटीतून डबल मेजर डिग्री घेतली आहे. आरसीबीची ब्रँड स्ट्रॅटेजी आणि मार्केटिंगमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. आरसीबीच्या पहिल्या आयपीएलच्या विजायनंतर बंगळुरूच्या बस परेडच्या प्लानिंगमध्ये निखिलचीही भूमिका महत्त्वाची असेल असं सांगितलं जात आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.