टीम इंडियाचा पराभवाला जबाबदार कोण? पाहा काय वाटतंय क्रिकेट चाहत्यांना

Team India : भारतीय संघाच्या पराभवाला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला तर तुम्ही काय उत्तर द्याल. १० सामने जिंकणाऱ्या टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. यासाठी तुम्ही कोणाला जबाबदार ठरवता. तुमची प्रतिक्रिया काय?

टीम इंडियाचा पराभवाला जबाबदार कोण? पाहा काय वाटतंय क्रिकेट चाहत्यांना
team india
Follow us
| Updated on: Nov 21, 2023 | 5:38 PM

India vs Australia : टीम इंडिया पुन्हा एकदा वर्ल्डकप जिंकण्यात अपयश ठरला. गेल्या 12 वर्षांपासून विश्वचषकाचे स्वप्न अपूरे राहिले. यंदा भारताकडे मोठी संधी होती. पण २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला 6 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात टीम इंडियाचा पराभव नेमका कशामुळे झाला. कोण याला जबाबदार आहे.

सलग १० सामने जिंकण्यात यश

टीम इंडियाने सलग 10 सामने जिंकले होते. त्यामुळे चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. भारतीय संध वर्ल्डकप नक्कीच जिंकेल अशी आशा प्रत्येकाला होती. पण तसे होऊ शकले नाही. भारतीय फलंदाज आणि गोलंदाज दोघांनी ही १० सामन्यात चांगली कामगिरी केली. तर टीम इंडियाच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवामागे कोण जबाबदार आहे यासंदर्भात अनेकांच्या वेगवेगळी मते आहेत. तुम्हाला काय वाटतं तुम्ही देखील तुमचं मत मांडू शकता. कमेंट करुन तुमचं मत मांडा.

पराभवाला जबाबदार कोण?

जवळपास  ६० टक्के लोकांना असे वाटते की, फलंदाजीमुळे भारतीय टीमचा पराभव झाला. टीम इंडियाच्या पराभवाला अनेकांनी फलंदाजीला दोषी ठरवले आहे. तर १० टक्के लोकांना असं वाटतं की, गोलंदाजीमुळे भारतीय संघाचा पराभव झाला. १० टक्के लोकांना असे ही वाटते की, भारतीय टीमच्या खराब फिल्डिंगमुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र २० टक्के लोकांना असे वाटते की,  टॉसमुळे टीम इंडियाचा पराभव झाला.

फायनल सामन्यात भारताचा पराभव

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली. भारतीय संघाने सर्वबाद 240 धावा केल्या. भारतीय संघाकडून केएल राहुलने 107 बॉलमध्ये 66 धावा केल्या. तर विराट कोहलीने 63 चेंडूत 54 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने शानदार शतक झळकावले आणि भारताच्या विजयाची घौडदोड रोखली.

Non Stop LIVE Update
मोदी Vs गांधींची लढाई, ५ राज्यांच्या निकालाआधीचा Exit Poll काय सांगतो
मोदी Vs गांधींची लढाई, ५ राज्यांच्या निकालाआधीचा Exit Poll काय सांगतो.
छगन भुजबळ यांचा थेट शरद पवार यांनाच सवाल; थेट म्हणाले...
छगन भुजबळ यांचा थेट शरद पवार यांनाच सवाल; थेट म्हणाले....
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास.
२०२४ ला भाजपपासून भारताला मुक्ती मिळणार, संजय राऊत यांची जहरी टीका काय
२०२४ ला भाजपपासून भारताला मुक्ती मिळणार, संजय राऊत यांची जहरी टीका काय.
जरांगेंच्या दौऱ्याचा चौथा टप्पा, सभेची जय्यत तयारी, अवघं जालना भगवंमय
जरांगेंच्या दौऱ्याचा चौथा टप्पा, सभेची जय्यत तयारी, अवघं जालना भगवंमय.
गुणरत्न सदावर्तेंना सर्वात मोठा झटका, ST कर्मचारी बँकेतील 17 संचालक...
गुणरत्न सदावर्तेंना सर्वात मोठा झटका, ST कर्मचारी बँकेतील 17 संचालक....
५ राज्यांचा एक्झिट पोल, कुठं कुणाची सत्ता येणार? बघा tv9 मराठीवर
५ राज्यांचा एक्झिट पोल, कुठं कुणाची सत्ता येणार? बघा tv9 मराठीवर.
अस्मानी संकट पण सुलतान कुठे? शिंदेंच्या प्रचार दौऱ्यावरून कुणाची टीका?
अस्मानी संकट पण सुलतान कुठे? शिंदेंच्या प्रचार दौऱ्यावरून कुणाची टीका?.
मोदींसोबत जवळीक वाढवण्यासाठी शिंदेंचा खटाटोप, उबाठा नेत्याचा टोला काय?
मोदींसोबत जवळीक वाढवण्यासाठी शिंदेंचा खटाटोप, उबाठा नेत्याचा टोला काय?.
मनोज जरांगे पाटील लहान, त्यांनी अभ्यास करावा; कुणी दिला खोचक सल्ला
मनोज जरांगे पाटील लहान, त्यांनी अभ्यास करावा; कुणी दिला खोचक सल्ला.