AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत श्रेयस अय्यरची जागा कोण घेणार? तिलक वर्मासह तीन नावं चर्चेत

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका संपली असून आात दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेचे वेध लागले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध निवडलेला संघच दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळेल यात काही शंका नाही. पण दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरची जागा कोण घेणार हा प्रश्न आहे. या शर्यतीत तीन खेळाडू आहेत.

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत श्रेयस अय्यरची जागा कोण घेणार? तिलक वर्मासह तीन नावं चर्चेत
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत श्रेयस अय्यरची जागा कोण घेणार? तिलक वर्मासह तीन नावं चर्चेतImage Credit source: Getty Images/ PTI
| Updated on: Oct 28, 2025 | 6:42 PM
Share

ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका संपल्यानंतर आता दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी तयारी सुरु झाली आहे. पुढच्या महिन्यात म्हणजेच 30 नोव्हेंबरला दक्षिण अफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध निवडलेला संघच या मालिकेत खेळेल. त्यात फार काही बदल होईल असं वाटत नाही. पण श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्याने त्याची जागा भरून काढणं गरजेचं आहे. कारण श्रेयस अय्यर अजून एक महिना तरी रिकव्हर होणं कठीण आहे. त्यामुळे त्याच्या जागी कोणत्या खेळाडूची निवड करायची हा पेच असणार आहे. या यादीत तीन खेळाडू असून त्यापैकी एकाची निवड होऊ शकते.

संजू सॅमसन : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत संजू सॅमसन याची निवड होईल असं बोललं जात होतं. सलामीला फलंदाजी करेल वगैरे चर्चा रंगली होती. पण त्याला संघात काही स्थान मिळालं नाही. आता चौथं स्थान रिक्त असल्याने त्याची दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत निवड होऊ शकते. मागच्या वनडे मालिकेत त्याने चांगली कामगिरी केली होती. सॅमसनने 16 वनडे सामन्यात 56.66 च्या सरासरीने 510 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक शतक आणि तीन अर्धशतकं आहेत. श्रेयस अय्यरची जागा घेऊ शकतो.

तिलक वर्मा : श्रेयस अय्यरसाठी तिलक वर्मा हा चांगला पर्याय ठरू शकतो. कारण आशिया कप स्पर्धेत त्याने सावध पण विजयी खेळी केली होती. त्याच्या खेळीमुळे टीम इंडियाला जेतेपद मिळवता आलं होतं. 2023 मध्ये त्याने बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याने चार सामन्यात 68 धावा केल्या आहेत. सध्या फॉर्मात असून आत्मविश्वासही चांगला आहे.

रियान पराग : श्रेयस अय्यरच्या जागी अष्टपैलू रियान पराग हा तिसरा पर्याय ठरू शकतो. रियान परागने श्रीलंकेविरुद्ध वनडे सामन्यात पदार्पण केलं होतं. पण दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडावं लागलं. फक्त एकच सामना खेळला आणि त्याने 15 धावा केल्या. तसेच तीन विकेट घेतल्या. नऊ टी20 सामन्यातील सहा डावात 106 धावा केल्या असून 4 विकेट घेतल्या आहेत.

...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.