AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shreyas Iyer : श्रेयस अय्यरवर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची वेळ, नेमकं काय झालं ते जाणून घ्या

टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला ऑस्ट्रेलियातील सिडनी रुग्णालयात भरती केलं आहे. तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यानत्याला गंभीर दुखापत झाली होती. मैदानातच कळवळला होता. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली होती.

Shreyas Iyer : श्रेयस अय्यरवर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची वेळ, नेमकं काय झालं ते जाणून घ्या
Shreyas Iyer : श्रेयस अय्यरवर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची वेळ, नेमकं काय झालं ते जाणून घ्याImage Credit source: TV9 Network/Kannada
| Updated on: Oct 28, 2025 | 5:35 PM
Share

भारतीय संघाचा स्टार फलंदाज दुखापतीने त्रस्त आहे. कधी संघात तर कधी संघाच्या बाहेर अशी त्याची स्थिती आहे. नुकताच दुखापतीतून सावरून टीम इंडियात कमबॅक केलं होतं. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात झेल पकडताना गंभीर दुखापत झाली आणि पुन्हा एकदा दुखापतग्रस्त झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर एलेक्स कॅरीचा झेल पकडताना अय्यर पडला होता. यावेळी त्याच्या बरगड्यांच्या खाली गंभीर दुखापत झाली. तपासणीत त्याच्या स्प्लिनमधून हलका रक्तस्राव होत असल्याचं निष्पन्नझालं. त्यानंतर त्याला आयसीयूत भरती करण्याची वेळ आली. आता त्याच्या सर्जरीबाबत अपडेट समोर आली आहे. श्रेयर अय्यरच्या स्प्लीनला झालेल्या जखमेवर यशस्वीरित्य शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आता तो पूर्णपणे बरा असून दुखापतीतून सावरत आहे.

क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, श्रेयस अय्यर आता पूर्णपणे स्थित आहे. त्याला आयसीयुतून बाहेर आणलं आहे. एक छोटी शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली आणि ती यशस्वीरित्या पार पडली. पण त्याला सिडनी रुग्णालायत कमीत कमी पाच दिवस किंवा त्यापेक्षा अधिक काळ राहावं लागणार आहे. त्याला एक आठवडा आरामाचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे अजून पाच सहा दिवस तरी श्रेयस अय्यर रुग्णालयात असणार आहे. त्याला सामान्य वार्डमध्ये शिफ्ट केलं आहे. आता त्याची प्रकृती सुधारत असून जिवाला कोणताही धोका नसल्याने क्रीडाप्रेमींचा जीव भांड्यात पडला आहे.

बीसीसीआयची वैद्यकीय टीम श्रेयस अय्यरच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. सिडनीतील स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या संपर्कात आहे. श्रेयस अय्यरला डिस्चार्ज मिळताच थेट भारतात परतणार आहे. मात्र त्याला मैदानात परतण्यासाठी आणखी सहा आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकणार आहे. ही मालिका पुढच्या महिन्यात 30 नोव्हेंबरला सुरु होणार आहे.

दुसरीकडे, श्रेयस अय्यरचे वडील संतोष अय्यर यांनी आता ऑस्ट्रेलियाला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी डॉक्टरांवर विश्वास व्यक्त केला आहे.अय्यरच्या कुटुंबाला त्याच्या प्रकृतीबद्दल सिडनीहून नियमित अपडेट मिळत आहेत. दुसरीकडे, कर्णधार सूर्यकुमार यादवने अय्यरबाबत सांगितलं की, ‘मी आता अय्यरशी बोललो आहे आणि तो आता बरा आहे. पुढील काही दिवस त्यांच्या देखरेखीखाली असेल. आम्ही त्याला त्याच्यासोबत घरी घेऊन जाऊ.’

भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.