AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाचं कर्णधारपद का सोडलं? विराट कोहलीने चार वर्षानंतर कुठे खरं काय ते सांगितलं

विराट कोहलीने भारत आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं नेतृत्व केलं आहे. मात्र त्यानंतर त्याने कर्णधारपदाला सोडचिठ्ठी दिली आणि फक्त फलंदाजीवर लक्ष्य केंद्रीत केलं. पण त्याने कर्णधारपद का सोडलं याबाबत खरं कारण कोणालाच माहिती नव्हतं. अखेर चार वर्षानंतर विराट कोहलीने याबाबतचा खुलासा केला आहे. तसेच कर्णधारपद का सोडलं ते सांगितलं आहे.

टीम इंडियाचं कर्णधारपद का सोडलं? विराट कोहलीने चार वर्षानंतर कुठे खरं काय ते सांगितलं
विराट कोहलीImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 06, 2025 | 5:16 PM
Share

विराट कोहलीने टी20 वर्ल्डकप 2021 नंतर कर्णधारपद सोडलं होतं. त्यानंतर आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कर्णधारपदालाही रामराम ठोकला. त्यानंतर एका वर्षानंतर दक्षिण अफ्रिकेविरुद्ध पराभूत झाल्यानंतर कसोटी कर्णधारपदही सोडलं. त्यानंतर कर्णधारपदाची माळ रोहित शर्माच्या गळ्यात पडली. पण विराट कोहलीने कर्णधारपद का सोडलं? याची चर्चा तेव्हा रंगली होती. पण खरं कारण कोणालाच माहिती नव्हतं. अखेर चार वर्षानंतर विराट कोहलीने खुलासा केला आहे. विराट कोहलीने सांगितलं की, ‘एक वेळ अशी आली की जेव्हा माझ्या कारकि‍र्दीत बरंच काही घडलं आणि माझ्यासाठी ते खूपच कठीण झालं. मी 7-8 वर्षे भारताचं नेतृत्व करत होते. मी 9 वर्षे आरसीबीचं नेतृत्व केलं. मी जे काही सामने खेळलो, त्यात माझ्याकडून फलंदाज म्हणून खूपच अपेक्षा होत्या.’

‘मला कळतंच नव्हतं की मी लक्ष केंद्रीत करण्यास संघर्ष करत आहे. कर्णधारपद भूषवताना तसं होत नव्हतं. पण फलंदाजी करताना तसं होत होतं. मी प्रत्येक वेळी त्याचाच विचार करायचो. ते माझ्यासाठी खूपच कठीण झालं होतं. अखेर या सर्व गोष्टींचा माझ्यावर खूपच दबाव वाढला होता.’ विराट कोहलीने 2022 मध्ये क्रिकेटमधून एक महिन्यांचा ब्रेक घेतला होता. तेव्हा त्याने बॅटला स्पर्शही केला नव्हता. तसेच सार्वजनिक जीवनात आनंदी राहण्यासाठी संघर्ष करत होता.

विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचं कारण सांगत म्हणाली की, ‘मी कर्णधारपद सोडलं कारण मला वाटले की जर मला खेळात राहायचे असेल तर माझ्यासाठी आनंदी राहणं महत्त्वाचं आहे.’ विराट कोहली पुढे म्हणाली की, ‘मला माझ्या आयुष्यात अशा ठिकाणी असण्याची गरज होती जिथे मी राहू शकेन, तसेच माझे क्रिकेट खेळू शकेन. कोणत्याही टीकेशिवाय. या पर्वात तु्म्ही काय करणार आहात आणि पुढे काय होणार आह हे न पाहता.’ विराट कोहली आयपीएल 2025 स्पर्धेत रजत पाटिदारच्या नेतृत्वात आरसीबी संघाकडून खेळत आहे. या पर्वात विराट कोहली जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने 500 हून अधिक धावा केल्या आहेत. तसेच सर्वाधिक 7 अर्धशतकं ठोकली आहेत.

Follow Us
दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
नाना पाटेकरांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय...
नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम यात्रेची तयारी सुरू
शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
Nana Patekar Passes Away: शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
Delhi India Alliance : इंडिया आघाडीचा मोठा प्लॅन; 10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या...
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या पदाधिकाऱ्याने दिली मोठी माहिती
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...