Umaran Malik : उमरान मलिकला फक्त एकच ओवर मिळाली, पुढच्या सामन्यात संधी मिळेल का? पाहा हार्दिक पांड्या काय म्हणतो…

आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात उमरानला चांगलाच महागात पडला. आयर्लंडविरुद्ध त्याला एकच षटक टाकाता आलं. यामध्ये त्यानं एक चौकार आणि एक षटकार मारून एकूण 14 धावा दिल्या.

Umaran Malik : उमरान मलिकला फक्त एकच ओवर मिळाली, पुढच्या सामन्यात संधी मिळेल का? पाहा हार्दिक पांड्या काय म्हणतो...
उमरान मलिकImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 27, 2022 | 10:06 AM

नवी दिल्ली : भारतानं (IND) आयर्लंड दौऱ्याची सुरुवात विजयानं केली. टीम इंडियानं डब्लिनमधील पहिला टी-20 (T-20) सामना 7 गडी राखून जिंकलाय. आता दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी झालीय. पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला. 12-12 षटकांच्या या सामन्यात टीम इंडियानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात 22 वर्षीय वेगवान गोलंदाज उमरान मलिकनं (Umaran Malik) भारताकडून पदार्पण केलंय. आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात उमरानला चांगलाच महागात पडला. आयर्लंडविरुद्ध त्याला एकच षटक टाकाता आलं. यामध्ये त्यानं एक चौकार आणि एक षटकार मारून एकूण 14 धावा दिल्या. यानंतर कर्णधार हार्दिक पांड्यानं त्याला संधी दिली नाही. आता पुढे त्याला संधी मिळणार का, यावर हार्दिक पांड्या नेमकं काय म्हणाला, ते जाणून घ्या..

हार्दिक पांड्या नेमकं काय म्हणाला?

हार्दिक पांड्या काय म्हणाला?

हार्दिक पांड्यानं सामन्यानंतर उमरान मलिकबद्दल सांगितलं ‘उमराननं फ्रँचायझी क्रिकेटसाठी चांगली कामगिरी केली आहे. माझ्याशी बोलल्यानंतर त्याला थांबवण्यात आलं, तो जुन्या चेंडूवर अधिक सोयीस्कर आहे. पण, येथे मला त्याच्यासाठी फारशी संधी दिसली नाही, आशा आहे की तो अधिक चांगलं खेळू शकेल. पुढच्या सामन्यात त्याला संधी देऊ.’  यासह तो म्हणाला की, “विजयानं मालिकेची सुरुवात करणं चांगलं आहे. एक संघ म्हणून विजयानं सुरुवात करणे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्याबद्दल खूप आनंदी आहे. आयर्लंडनं शानदार फलंदाजी केली ज्यामुळे मी आमच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक बनलो. शेवटी पासलाही परत जावं लागलं. हॅरीनं खेळलेले काही शॉट्स मनाला भिडणारे होते,’ असंही हार्दिक यावेळी म्हणाला.

बीसीसीआयचं ट्विट

सुरुवात खराब

सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या दोन षटकांत संघाने दोन विकेट गमावल्या होत्या. भुवनेश्वर कुमारनं पहिल्याच षटकात कर्णधार अँड्र्यू बालबर्नीला क्लीन बोल्ड केलं. बलबर्नी शून्यावर बाद झाला. यानंतर भारतीय कर्णधार हार्दिक पांड्यानं दुसऱ्याच षटकात पॉल स्टर्लिंगला दीपक हुडाच्या गोलंदाजीवर झेलबाद केलं. स्टर्लिंगला चार धावा करता आल्या. यानंतर पाचव्या षटकात गॅरेथ डेलानी यष्टिरक्षक कार्तिकला आवेश खानकडून झेलबाद केलं. डेलेनी आठ धावा करू शकला. आयर्लंडनं 22 धावांत तीन विकेट गमावल्या.

त्यानंतर हॅरी आणि लॉर्कन टकर यांनी आयर्लंडचा डाव सांभाळला आणि चौथ्या विकेटसाठी 29 चेंडूत 50 धावांची भागीदारी केली. युझवेंद्र चहलनं हॅरीला अक्षर पटेलकडून झेलबाद कंले. टकरला 16 चेंडूत 18 धावा करता आल्या. या खेळीत त्यानं दोन षटकार मारले. त्याचवेळी, हॅरी पहिल्या 30 चेंडूंमध्ये आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावलं.

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.