AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Watch: ‘तुम्ही मुलं मला हार्ट अ‍टॅक आणाल’ मैदानावरचे अंपायर भारतीय खेळाडूंना असं का म्हणाले?

मार्कराम बाद होण्याच्याआधी त्याचा षटकात शार्दुल ठाकूरने मार्कराम विरोधात दोन जोरदार अपील केले होते. त्यामुळे मैदानावरील वातावरण तापले.

Watch: 'तुम्ही मुलं मला हार्ट अ‍टॅक आणाल' मैदानावरचे अंपायर भारतीय खेळाडूंना असं का म्हणाले?
| Edited By: | Updated on: Jan 06, 2022 | 5:08 PM
Share

जोहान्सबर्ग: जिंकण्याची इर्षा, त्वेष यामुळे जोहान्सबर्गच्या वाँडर्स स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्यात मैदानावरील वातावरण तापत चाललं आहे. खेळाडूंमध्ये खुन्नस, ठसनच्या घटना मैदानावर घडत असून मैदानावरील पंचांना सुद्धा त्याची धग जाणवतेय. शार्दुल ठाकूरचं षटक संपल्यानंतर अंपायर इरास्मस यांनी मैदानावर घडणाऱ्या घटनाक्रमामुळे आपल्याला हार्ट अ‍टॅक येईल असं म्हटलं. (Why umpire Erasmus said to India ‘you guys are giving me a heart-attack’)

दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरु असताना डावाच्या 10 व्या षटकात शार्दुल ठाकूरने एडन मार्करामला आऊट केलं. मार्कराम बाद होण्याच्याआधी त्याचा षटकात शार्दुल ठाकूरने मार्कराम विरोधात दोन जोरदार अपील केले होते. त्यामुळे मैदानावरील वातावरण तापले.

षटक संपल्यानंतर खेळाडू बाजू बदलत होते. त्यावेळी पंच इरास्मस यांनी “प्रत्येक षटकानंतर तुम्ही मुलं मला हार्ट अ‍टॅक आणाल” असं विधान केलं. स्टंम्पसवरच्या मायक्रोफोनने ते शब्द ऐकले. इरास्मस यांनी जे म्हटलं, तिसऱ्यादिवसाच्या खेळात मैदानावर तसंच घडत होतं. दोन्ही बाजूच्या खेळाडूंमध्ये मैदानावर शाब्दीक बाचाबाची सुरु होती.

ऋषभ पंत फलंदाजी करत असताना, रेसी वान डर डुसेंने स्लेजिंग केले. जसप्रीत बुमराह हा शांत स्वभावाचा खेळाडू म्हणून ओळखला जातो. पण त्याचा सुद्धा संयम सुटला व मैदानावर आफ्रिकेचा गोलंदाज मार्को जॅनसेनला तो भिडला.

संबंधित बातम्या: 

ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देणारी भारताची कॅप्टन मिताली राजबद्दल काही खास गोष्टी IND vs SA: ‘तुम्ही जोहान्सबर्ग कसोटी जिंका हेच त्याच्यासाठी बेस्ट बर्थ डे गिफ्ट’, गावस्करांची टीम इंडियाला विनंती Rishabh Pant: ‘मला खात्रीय राहुल द्रविडनं त्याला बांबू लावला असेल’, पंतच्या खेळण्यावर गावस्करांचा टिपिकल मराठमोळा अवतार

(Why umpire Erasmus said to India ‘you guys are giving me a heart-attack’)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.