AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WI vs IND T20I Series 2023 | वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

West Indies vs Team India T20I Series | बीसीसीआयने वेस्ट इंडिज विरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे.

WI vs IND T20I Series 2023 | वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jul 05, 2023 | 10:14 PM
Share

मुंबई | टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात 12 जुलैपासून होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया विंडिज विरुद्ध कसोटी वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी 20 सामने खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयने 23 जून रोजी कसोटी आणि वनडे सीरिजसाठी संघ जाहीर केला. त्यानंतर आता बीसीसीआयने टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे.

अजित आगरकर यांची पहिलीच टीम

बीसीसीआयने विंडिज विरुद्धच्या या टी 20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केलाय. अजित आगरकर यांची क्रिकेट सल्लागार समितीने 4 जुलै रोजी निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आगरकर यांनी खेळाडूंची निवड केली.

कर्णधारपदी कोण?

या टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाच्या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यामध्ये कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह इतरांचा समावेश आहे.  त्यामुळे हार्दिक पंड्या विंडिज विरुद्धच्या या मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर मुंबईकर सूर्यकुमार यादव याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच यशस्वी जयस्वाल आणि तिलक वर्मा या दोघांची पहिल्यांदाच टीम इंडियात निवड करण्यात आली आहे.

विंडिज विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया

रवी बिश्नोई याचं कमबॅक

टीम इंडियात विंडिज विरुद्धच्या टी 20 सीरिजमधून फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई याचं जवळपास  1 वर्षांनी पुनरागमन झालंय. रवीने अखेरचा टी 20 सामना 4 सप्टेंबर 2022 रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळला होता.

विंडिज विरुद्ध टीम इंडिया टी 20 सीरिज वेळापत्रक

पहिला सामना, 3 ऑगस्ट.

दुसरा सामना, 6 ऑगस्ट.

तिसरा सामना, 8 ऑगस्ट.

चौथा सामना, 12 ऑगस्ट.

पाचवा सामना – 13 ऑगस्ट.

विंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया

हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.

दरम्यान उभयसंघात टी 20 मालिकेआधी एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे.

वनडे मालिकेसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, रुतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, आर. जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक आणि मुकेश कुमार.

वनडे मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, गुरुवार 27 जुलै, बारबाडोस.

दुसरा सामना, शनिवार 29 जुलै, बारबाडोस.

तिसरा सामना, मंगळवार 1 ऑगस्ट, त्रिनिदाद.

कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिली कसोटी, 12 ते 16 जुलै, विंडसर पार्क, डोमिनिका.

दुसरी कसोटी, 20 ते 24 जुलै, क्विन्स पार्क, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद.

Follow Us
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा