AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WI vs IND 1st Test | : वर्ल्ड टेस्ट फायनलमधील ‘हा’ निर्णय म्हणजे द्रविड आणि रोहित यांची करिअरमधील सर्वात मोठी चूक

कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य कोच राहुल द्रविड यांचा एक निर्णय कायम सर्वांच्या आठवणीत राहणारा आहे. हा निर्णय काही सकारात्मक म्हणून नाही तर त्यांच्या करिअरमधील चूक म्हणूनच लक्षात राहिल.

WI vs IND 1st Test | : वर्ल्ड टेस्ट फायनलमधील 'हा' निर्णय म्हणजे द्रविड आणि रोहित यांची करिअरमधील सर्वात मोठी चूक
| Updated on: Jul 13, 2023 | 6:08 PM
Share

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत ट्रॉफीवर नाव कोरलं. (WI vs IND) टीम इंडियाने दोनवेळा फायनलपर्यंत धडक मारली मात्र अंतिम सामन्यात संघाच्या पदरी कायम हार पडली. विराट कोहली कर्णधार असताना न्यूझीलंडने टीम इंडियाला नमवत पहिल्यांदा ट्रॉफीवर नाव कोरलं होतं त्यानंतर आता ऑस्ट्रेलिया संघाने हा कारनामा केला. मात्र फायनलमध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य कोच राहुल द्रविड यांचा एक निर्णय कायम सर्वांच्या आठवणीत राहणारा आहे. हा निर्णय काही सकारात्मक म्हणून नाही तर त्यांच्या करिअरमधील चूक म्हणूनच लक्षात राहिल.

कोणता होता तो निर्णय?

ऑस्ट्रेलिया आणि भारत अंतिम सामन्यामध्ये जो संघ निवडला होता त्यामध्ये आर. अश्विन याला संधी न दिली गेली नव्हती. यामुळे संपूर्ण क्रिकेट जगतात याची चर्चा झाली होती, ज्या खेळाडूमुळे तुम्हाला फायनलपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिक बजावली त्याच खेळाडूला बेंचवर बसवणं हे सर्वांसाठी धक्कदायक होतं. मात्र अश्विन काही हार माननारा नाही. हे पठ्ठ्याने आपल्या कामगरीमधून अनेकदा दाखवून दिलं आहे. कुलदीप यादव आणि चहल संघात आल्यावर अश्विनला आता संघात जागा मिळते की नाही याबाबत शंका होती. पण भावड्याने जागा तर मिळवलीच त्यासोबतच कमबॅक काय असतं ते दाखवून दिलं.

वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना सुरू आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी अश्विनने अर्धा कॅरेबियन संघ तंबूत पाठवला. वेस्ट इंडिजच्या डावाला सुरूवात झाल्यावर सावध पवित्रा घेतलेल्या कार्लोस ब्रेथवेट आणि चंद्रपॉल यांची जोडी फोडत अश्विनने चंद्रपॉलला बोल्ड करत संघाचं खातं उघडलं. वेस्ट इंजिडचा पहिला डाव 150 धावांवर आटोपला यामधील 60 धावांमध्ये  अश्विनने 5 विकेट्स घेतल्या.

दरम्यान, अश्विनला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलच्या अंतिम 11 मध्ये स्थान मिळालं असतं तर कदाचित सामन्याचा निकाल काही वेगळा लागला असता. अश्विनने आपला लढवय्या बाणा कायम ठेवला असून विक्रमांणा गवसणी घालत आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.