WI vs PAK : विंडीज सलग दुसऱ्या सामन्यासह मालिका विजयासाठी सज्ज, पाकिस्तानला लोळवणार का?
West Indies vs Pakistan 3rd T20I Live Streaming : पाकिस्तान क्रिकेट टीम वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. उभयसंघातील 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे अंतिम सामन्यासह मालिका कोण जिंकतो? याकडे क्रिकेट चाहत्यांची नजर असणार आहे.

बांगलादेश क्रिकेट टीमने मायदेशात टी 20i मालिकेत लोळवल्यानंतर आता पाकिस्तानवर आणखी एक सीरिज गमावण्याची टांगती तलवार आहे. बांगलादेश दौऱ्यानंतर पाकिस्तान क्रिकेट टीम सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. पाकिस्तानने या दौऱ्यातील पहिल्या टी 20i सामन्यात विंडीजवर 14 धावांनी मात करत विजयी सलामी दिली. पाकिस्तानने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली. त्यामुळे यजमानांसाठी दुसरा सामना हा मालिकेच्या दृष्टीने करो या मरो असा होता. विंडीजने या दुसऱ्या सामन्यात जोरदार कमबॅक करत पाकिस्तानवर 3 ऑगस्ट रोजी 2 विकेट्सने विजय मिळवला. विंडीजने यासह विजयाचं खातं उघडत मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. त्यामुळे आता तिसरा आणि अंतिम सामना रगंतदार आणि चुरशीचा होणार आहे.
पाकिस्तानवर आधीच बांगलादेश विरुद्ध टी 20i मालिका गमावल्याने दबाव आहे. त्यानंतर आता ही मालिका बरोबरीत आहे.त्यामुळे पाकिस्तानला विंडीजच्या तुलनेत मालिका पराभवाची भीती अधिक आहे. त्यामुळे तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात चुरस पाहायला मिळणार, यात शंका नाही. तिसऱ्या सामन्यात शाई होप विंडीजचं नेतृत्व करणार आहे. तर सलमान आघा याच्याकडे पाकिस्तानच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. हा तिसरा आणि अंतिम सामना कुठे आणि कधी होणार? हे जाणून घेऊयात.
विंडीज विरुद्ध पाकिस्तान तिसरा टी 20i सामना कधी?
विंडीज विरुद्ध पाकिस्तान तिसरा टी 20i सामना सोमवारी 4 ऑगस्टला होणार आहे.
विंडीज विरुद्ध पाकिस्तान तिसरा टी 20i सामना कुठे?
विंडीज विरुद्ध पाकिस्तान तिसरा टी 20i सामना सेंट्रल ब्रोवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा येथे आयोजित करण्यात आला आहे.
विंडीज विरुद्ध पाकिस्तान तिसऱ्या टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
विंडीज विरुद्ध पाकिस्तान तिसऱ्या टी 20i सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 5 वाजता टॉस होईल.
विंडीज विरुद्ध पाकिस्तान तिसरा टी 20i सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
विंडीज विरुद्ध पाकिस्तान तिसरा टी 20i सामना भारतात टीव्हीवर दाखवण्यात येणार नाही.
विंडीज विरुद्ध पाकिस्तान तिसरा टी 20i सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
विंडीज विरुद्ध पाकिस्तान तिसरा टी 20i सामना मोबाईलवर फॅन कोड एपद्वारे पाहाता येईल.
विंडीज मालिका जिंकणार का?
विंडीज घरच्या मैदानात खेळत असल्याने पाकिस्तानच्या तुलनेत त्यांना अधिक फायदा आहे. विंडीजला त्यामुळे घरातील चाहत्यांचं अधिक समर्थन असणार आहे. मात्र मैदानातील कामगिरीवर विजेता ठरणार आहे. त्यामुळे विंडीज सलग दुसऱ्या विजयासह मालिकेवर नाव कोरणार की पाकिस्तान आशिया कपआधी सीरिज जिंकण्यात यशस्वी ठरणार? हे काही तासांतच स्पष्ट होईल.
