WI vs PAK : बांगलादेश विरुद्ध मालिका गमावल्यानंतर पाकिस्तानसमोर विंडीजचं आव्हान, पहिला टी 20i सामना केव्हा?
West Indies vs Pakistan 1st T20I Live Streaming : पाकिस्तानला बांगलादेश दौऱ्यातील 3 सामन्यांच्या टी 20i मालिकेत 1-2 ने पराभूत व्हावं लागलं होतं. त्यानंतर आता पाकिस्तानसमोर विंडीजचं आव्हान असणार आहे.

बांगलादेश क्रिकेट टीमने लिटन दास याच्या नेतृत्वात श्रीलंकेला त्यांच्याच घरात टी 20i मालिकेत पराभूत केलं आणि इतिहास घडवला. या ऐतिहासिक विजयानंतर बांगलादेशने मायदेशेता पाकिस्तानवर टी 20i मालिकेत विजय मिळवला. बांगलादेशने पहिले आणि सलग 2 सामने जिंकत 3 सामन्यांची मालिका आपल्या नावावर केली. तर पाकिस्ताने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात लाज राखली. पाकिस्तानने या अंतिम सामन्यात बांगलादेशवर मात केली. त्यानंतर आता पाकिस्तान विंडीज दौऱ्यावर आहे. पाकिस्तानच्या विंडीज दौऱ्याची सुरुवात 1 ऑगस्टपासून होत आहे.
पाकिस्तानच्या या दौऱ्याचं आयोजन हे 1 ते 12 ऑगस्ट दरम्यान करण्यात आलं आहे. पाकिस्तान या दौऱ्यात विंडीज विरुद्ध प्रत्येकी 3 सामन्यांची टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात टी 20i मालिकेने होणार आहे. यजमान विंडीज संघाच्या नेतृत्वाची धुरा शे होप सांभाळणार आहे. तर सलमान आघा याच्याकडे पाकिस्तानच्या नेतृत्वाची धुरा आहे. उभयसंघातील पहिला सामना कुठे आणि कधी पाहता येणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.
विंडीज विरुद्ध पाकिस्तान पहिला टी 20i सामना कधी?
विंडीज विरुद्ध पाकिस्तान पहिला टी 20i शुक्रवारी 1 ऑगस्टला होणार आहे.
विंडीज विरुद्ध पाकिस्तान पहिला टी 20i सामना कुठे?
विंडीज विरुद्ध पाकिस्तान पहिला टी 20i सामना फ्लोरिडामधील सेंट्रल ब्रोवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड येथे आयोजित करण्यात आला आहे.
विंडीज विरुद्ध पाकिस्तान पहिल्या टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
विंडीज विरुद्ध पाकिस्तान पहिल्या टी 20i सामन्याला भारतीय वेळेनुसार पहाटे 5 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 5 वाजता टॉस होईल.
विंडीज विरुद्ध पाकिस्तान पहिला टी 20i सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
विंडीज विरुद्ध पाकिस्तान पहिला टी 20i सामना भारतात टीव्हीवर दाखवण्यात येणार नाही.
विंडीज विरुद्ध पाकिस्तान पहिला टी 20i सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
विंडीज विरुद्ध पाकिस्तान पहिला टी 20i सामना मोबाईलवर फॅनकोड एपद्वारे पाहायला मिळेल.
