रोहित शर्मा आणि विराट कोहलीबाबात सौरव गांगुलीचं मोठं वक्तव्य, 2027 वर्ल्डकपबाबत स्पष्टच सांगितलं की…

रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारताचे दिग्गज क्रिकेटपटू असून त्यांनी टी20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता हे दोघेही फलंदाज वनडे क्रिकेटमध्ये खेळताना दिसतील. असं असताना त्यांच्याबाबत सौरव गांगुलीने मोठं विधान केलं आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहलीबाबात सौरव गांगुलीचं मोठं वक्तव्य, 2027 वर्ल्डकपबाबत स्पष्टच सांगितलं की...
विराट कोहली आणि गौतम गंभीर
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 22, 2025 | 6:29 PM

रोहित शर्मा आणि विराट कोहली आता फक्त वनडे क्रिकेटमध्ये खेळताना दिसतील. या दोघांचं वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा खेळण्याचं स्वप्न असल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. त्यामुळे या दोघांनी वनडे क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेनंतर हे दोघंही या फॉर्मेटला रामराम ठोकतील. असं सर्व गणित क्रीडाप्रेमी मांडत असताना माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीने या दोघांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. यामुळे क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे. सौरव गांगुलीने पीटीआयशी बोलताना सांगितलं की, ‘आपल्याला समजून घ्यायला हवं की इतरांप्रमाणे एक दिवस खेळ त्यांच्यापासून दूर जाईल आणि ते खेळापासून दूर जातील.’ पुढचा वनडे वर्ल्डकप 2027 दक्षिण अफ्रिका-झिम्बाब्वे-नामिबिया यांच्या यजमानपदाखाली खेळला जाणार आहे.

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेवेळी विराट कोहली 38 तर रोहित शर्मा 40 वर्षांचा असणार आहे. या दरम्यान भारतीय संघ नऊ द्विपक्षीय वनडे मालिका खेळणार आहे. यात 27 सामने होणार आहेत. अशा परिस्थितीत वर्षातील 15 सामने सोपे असतील असं नाही. मी त्यांना काही सल्ला देत नाही कारण मला वाटतं की ते दोघेही आपला खेळ चांगल्या पद्धतीने समजतात, असंही सौरव गांगुलीन सांगितलं. 2023 वर्ल्डकप रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळला गेला होता. पण अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे रोहित शर्मा आणि संघ सहकारी खूपच निराश झाले होते. दरम्यान, रोहित शर्माने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली नसल्याने त्याच्याकडेच कर्णधारपद आहे.

सौरव गांगुलीने पुढे सांगितलं की, विराट कोहलीबाबत मला चिंता नाही. पण विराट कोहलीचा पर्याय शोधणं खूपच कठीण असणार आहे. त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने आश्चर्याचा धक्का बसल्याचं देखील गांगुलीने पुढे सांगितलं. दरम्यान, टीम इंडिया ऑगस्ट महिन्यात बांग्लादेश दौऱ्यावर जाणार आहे. ही मालिका 17 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहलीने 74 अर्धशतकं आणि 51 शतकं ठोकली आहेत. तर रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये तीन द्विशतक ठोकले आहेत. 264 हा त्याचा सर्वोत्तम स्कोअर आहे.