रोहित शर्मा आयपीएल 2026 स्पर्धेला मुकणार? नाणेफेकीचा कौल होताच हार्दिक पांड्याने दिले अपडेट
आयपीएल 2026 स्पर्धा सुरू असून मुंबई इंडियन्सची स्थिती नाजूक आहे. मुंबई इंडियन्सने सात पैकी 5 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे प्लेऑफचं गणित किचकट झालं आहे. अशा स्थितीत रोहित शर्मा कधी परतणार असाही प्रश्न आहे.

आयपीएल 2026 स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. टॉप 4 मध्ये जागा मिळवण्यासाठी जोरदार धडपड सुरू आहे. अशा स्थितीत मुंबई इंडियन्सची स्थिती नाजूक आहे. कारण मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. तसेच दोनच सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे आता प्लेऑफमध्ये जागा मिळवायची तर प्रत्येक सामना जर तरची लढाई असणार आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सला आता प्रत्येक सामन्यात सकारात्मक विचारांसह उतरावं लागणार आहे. मुंबई इंडियन्सचा या स्पर्धेतील आठवा सामना सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध होत आहे. या सामन्यातही स्टार फलंदाज रोहित शर्मा खेळत नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आता धाकधूक लागून आहे. कारण रोहित शर्मा आतापर्यंत चौथ्या सामन्यात खेळत नाही. त्यामुळे रोहित शर्मा मैदानात कधी परतणार याची चिंता क्रीडाप्रेमींना लागून आहे. असं असताना मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने त्याच्याबाबत अपडेट दिली आहे.
रोहित शर्मा सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही हे नाणेफेकीच्या वेळी कळणार होतं. त्यामुळे क्रीडाप्रेमींची उत्सुकता ताणली गेली होती. पण नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर प्लेइंग 11 जाहीर झाली त्यात रोहित शर्माचं नाव नव्हतं. त्याच्याबाबत समालोचकांनी कर्णधार हार्दिक पांड्याला विचारलं. तेव्हा त्याने सांगितलं की, ‘त्याला सावरण्यासाठी आणखी काही सामने लागतील. तो प्रयत्न करत आहे, पण त्याला हव्या असलेल्या पातळीवर तो नाही, त्यामुळे तो संघासाठी उपलब्ध नाही.’ त्यामुळे रोहित शर्मा मैदानात कधी परतेल हे काही सांगता येणं कठीण आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला होता. त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवू लागल्याने फिजिओकडून काही तात्पुरते उपचार करून घेतले. मात्र त्याला फलंदाजी करताना त्रास जाणवत होता. त्यामुळे पुढच्याच षटकात त्याने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला आणि रिटायर्ड हर्ट झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा दारूण पराभव झाला. रिपोर्टनुसार, रोहित शर्मा सध्या नेटमध्ये सराव करत आहे. पण दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. त्याच्याबाबत व्यवस्थापनही धोका पत्कारू इच्छित नाही.
