चॅम्पियन ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार की नाही? समोर आलं मोठं अपडेट

Champion Trophy 2025 : टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं पाकिस्तानात आयोजन असणार आहे. या स्पर्धेत 8 संघ खेळणार आहे. पण गेल्या काही वर्षांपासून भारताने पाकिस्तान दौरा केलेला नाही. त्यामुळे या स्पर्धेतून भारतीय संघ पाकिस्तान जाणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

चॅम्पियन ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार की नाही? समोर आलं मोठं अपडेट
Follow us
| Updated on: Apr 24, 2024 | 7:35 PM

चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचं 2017 नंतर पुन्हा एकदा आयोजन केलं जाणार आहे. ही स्पर्धा 2025 साली पाकिस्तानात होणार आहे.या स्पर्धेत आठ संघ सहभागी होणार आहे. 1996 नंतर पाकिस्तानात पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे. 1996 मोध्ये भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेने मिळून वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन केलं होतं. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी देत असल्याने भारताने सर्वच संबंध तोडले. भारत पाकिस्तानसोबत आयसीसी स्पर्धा सोडली तर मालिकाही खेळत नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2012-2013 मध्ये शेवटची मालिका खेळली गेली. तेव्हा पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. यात दोन टी20 आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली गेली होती. पण चॅम्पियन स्पर्धा 2025 चं आयोजन पाकिस्तानात होणार आहे. त्यामुळे आयसीसी स्पर्धा पाकिस्तानात होणार असल्याने भारतीय संघ जाणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याबाबत आता एक अपडेट समोर आला आहे. रिपोर्टनुसार, भारतीय संघ पाकिस्तान दौरा करणार नाही.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सूत्रांनी आयएएनएसला सांगितलं की, ‘टीम इंडिया पुढच्या वर्षी पाकिस्तानात होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी जाणार नाही.’ एकतर स्पर्धेचं आयोजन इतरत्र होईल किंवा हायब्रिड मॉडेलचा पर्याय निवडला गेला तर शक्य असल्याचं सांगण्यात येत आहे. आशिया कप 2023 स्पर्धेतही भारताने याच मार्गाच अवलंब केला होता. पण टीम इंडियाने पाकिस्तानात जाणं टाळलं होतं. आशिया कप स्पर्धेतील सामने भारताने श्रीलंकेत खेळले होते.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी सांगितलं होतं की, ‘जर भारताने पुढच्या वर्षी आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीसाठी टीम पाकिस्तानात पाठवली तर आम्ही मालिका खेळण्यास तयार आहोत.’ दुसरीकडे, बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं की, “मालिका तर सोडून द्या. भारतीय संघ चॅम्पियन ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा दौराही शक्य नाही. स्पर्धेचं ठिकाण बदललं जाऊ शकतं किंवा हायब्रिड मॉडेल असेल तरच शक्य आहे.” सूत्रांच्या माहितीनुसार, भारत पाकिस्तानाता संबंध चांगले नाहीत. भारतीय क्रिकेट बोर्डाला तिथे जाण्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे तिथे जाणं आतातरी शक्य दिसत नाही.

Non Stop LIVE Update
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.