AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ड्रीम इलेव्हननंतर ही कंपनी असेल टीम इंडियाची जर्सी स्पॉन्सर? बीसीसीआयच्या हातात निर्णय

भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सी प्रायोजकत्वाबाबत बऱ्याच काही अंधश्रद्धा पसरल्या आहे. स्पॉन्सरशिप दिल्यानंतर कंपनीचं वाटोळं होतं अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मजेशीर मीम्सही व्हायरल होत आहेत. असं असताना भारतीय संघाला नवा स्पॉन्सर मिळणार की स्पॉन्सरशिपशिवाय उतरणार हा प्रश्न आहे.

ड्रीम इलेव्हननंतर ही कंपनी असेल टीम इंडियाची जर्सी स्पॉन्सर? बीसीसीआयच्या हातात निर्णय
ड्रीम इलेव्हननंतर ही कंपनी असेल टीम इंडियाची जर्सी स्पॉन्सर? बीसीसीआयच्या हातात निर्णयImage Credit source: PTI
| Updated on: Aug 25, 2025 | 5:40 PM
Share

आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. असं असताना भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सी प्रायोजकत्वाबाबत पेच निर्माण झाला आहे. कारण केंद्र सरकारने ऑनलाईन मनी गेमिंगबाबत विधेयक पास केलं आणि ड्रीम 11 चा बाजार उठला आहे. त्यामुळे बीसीसीआयसोबतचा जर्सी स्पॉन्सरचा करार एक वर्षाआधीच संपला आहे. ड्रीम इलेव्हन आणि बीसीसीआयमध्ये 2023 मध्ये करार झाला होता. तीन वर्षांसाठी करार होता आणइ 2026 मध्ये संपणार होता. पण नव्या विधेयकामुळे व्यवसायच बंद झाला आहे. त्यामुळे कंपनीने या करारातून माघआर घेण्याच निर्णय घेतला आहे. तर बीसीसीआयने स्पष्ट केलं की, आम्ही स्वत: या कंपनीसोबत किंवा अशा कंपन्यांसोबत करार करू शकत नाही. त्यामुळे आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाला विना जर्सी प्रायोजक उतरावं लागणार आहे. जर बीसीसीआयने आशिया कप स्पर्धेपूर्वी करार केला तर हा प्रश्न सुटेल. पण नवा स्पॉन्सर शोधण्याचं आव्हान बीसीसीआयपुढे आहे. पण या प्रकरणात 65 हजार कोटीहून अधिक कमाई करणाऱ्या कंपनीचं नाव पुढे येत आहे. आशिया कप स्पर्धेसाठी दोन आठवड्यांचा अवधी शिल्लक असताना बीसीसीआयला हा पेच सोडवावा लागणार आहे.

आशिया कप स्पर्धेला दोन आठवडे शिल्लक असताना प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी टोयोटाने टीम इंडियाचं जर्सी स्पॉन्सरशिप घेण्यात रस दाखवला आहे. एका रिपोर्टनुसार, जापानची प्रसिद्ध कंपनी टोयोटा कंपनी भारताची टायटल स्पॉन्सर बनू इच्छित आहे. कंपनी सध्या भारतात टोयोटा किर्लोस्करसह भागीदारीत सुरु आहे. मागच्या आर्थिक वर्षात या कंपनीने 56500 कोटीहून अधिक कमावले होते. इतका मोठा टर्नओव्हर असलेली कंपनीने जर स्पॉन्सरशिपमध्ये रस दाखवला तर बीसीसीआय त्यावर विचार करू शकते. नुकतंच टोयोटा मोटर्सने इंग्लंड क्रिकेट संघाला टायटल स्पॉन्सर दिलं होतं. यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघासोबतही करार केला होता.

रिपोर्टनुसार, टोयोटा मोटर्सच नाही तर फिन टेक कंपनीने देखील स्पॉन्सरशिप देण्यात रस दाखवला आहे. पण या कंपनीचं नाव सध्या चर्चेत नाही. त्यामुळे बीसीसीआयकडे चांगले पर्याय आहेत. आता बीसीसीआय दोन आठवड्यात हा करार करणार का? असा प्रश्न समोर आला आहे. अन्यथा टीम इंडियाला विना स्पॉन्सर आशिया कप स्पर्धेत उतरावं लागणार आहे. जर तसं झालं तर बीसीसीआयला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे बीसीसीआयची या स्पर्धेपूर्वी धावपळ सुरु झाली आहे. भारताचा आशिया कप स्पर्धेत पहिला सामना 10 सप्टेंबरला ओमानविरुद्ध, 14 सप्टेंबरला दुसरा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट.
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद.
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ.
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष.