WIND vs WENG 1st Test | दीप्ती शर्माचा पंच, इंग्लंड 136 वर ऑलआऊट, टीम इंडियाला 292 धावांची आघाडी

WIND vs WENG 1st Test Day 2 | टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यावर घट्ट पकड मिळवली आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 400 प्लस मजल मारल्यानंतर इंग्लंडला 150 आत गुंडाळत मोठी आघाडी घेतली आहे.

WIND vs WENG 1st Test | दीप्ती शर्माचा पंच, इंग्लंड 136 वर ऑलआऊट, टीम इंडियाला 292 धावांची आघाडी
Follow us
| Updated on: Dec 15, 2023 | 3:05 PM

नवी मुंबई | वूमन्स क्रिकेट टीम इंडियाने पहिल्या डावात 428 धावा केल्यानंतर इंग्लंडला 136 धावांवर गुंडाळत 292 धावांची मोठी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने इंग्लंडला फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात बॅटिंग करण्यास पसंती दिली. त्यामुळे आता टीम इंडियाच्या महिला मंडळचा दुसऱ्या डावात डोंगराएवढ्या धावा करुन इंग्लंडला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे आता टीम इंडिया दुसऱ्या डावात किती धावांपर्यंत मजल मारतात, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

दुसऱ्या दिवसाचा खेळ

टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळसंपेपर्यंत 94 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 410 धावा केल्या. तेव्हा दीप्ती शर्मा 60 आणि पूजा वस्त्राकार 4 धावेवर नाबाद होती. दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली. मात्र टीम इंडियाला 3 विकेट्सच्या मोबदल्यात फक्त 18 धावा करता आल्या. टीम इंडियाचा पहिला डाव हा 104.3 ओव्हरमध्ये 428 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून चौघांनी अर्धशतकी खेळी केली. तर इतरांनीही चांगली साथ दिली.

टीम इंडियाच्या पहिल्या 9 फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. टीम इंडियाकडून स्मृती मंधाना हीने 17, शफाली वर्मा 19, शुभा सथीश 69, जेमिमाह रॉड्रिग्स 68, कॅप्टन हरमनप्रीत कौर 49, विकेटकीपर यास्तिका भाटीया 66, दीप्ती शर्मा 67 आणि स्नेह राणा हीने 30 धावा केल्या. तर पूजा वस्त्राकर हीने नाबाद 10 धावांचं योगदान दिलं. तर रेणूका सिंह 1 आणि राजेश्वरी गायकवाड झिरोवर आऊट झाली. इंग्लंडकडून लॉरेन बेल आणि सोफी एक्लेस्टोन या दोघींनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. केट क्रॉस, नॅट सायवर ब्रंट आणि चार्ली डीन या तिघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

इंग्लंड टीम इंडियासमोर फुस्स

त्यानंतर बॅटिंगसाठी आलेली इंग्लंड टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर फुस्स ठरली. टीम इंडियाने इंग्लंडला 35.3 ओव्हरमध्ये 136 धावांवर ऑलआऊट केलं. इंग्लंडकडून दोघी झिरोवर आऊट झाल्या. दोघींना दुहेरी आकडा गाठण्यात अपयश आलं. टॉप 3 फलंदाजांनी अनुक्रमे 10, 11 आणि 11 धावा केल्या. नॅट सायव्हर ब्रँट हीने सर्वाधिक 59 धावांचं योगदान दिलं. तर दोघींनी 19 आणि 12 अशा धावा केल्या.

टीम इंडियाकडून दीप्ती शर्मा हीने 5.3 ओव्हरपैकी 4 ओव्हर मेडन टाकल्या. दीप्तीने अवघ्या 7 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या. स्नेह राणा हीने 2 विकेट्स घेतल्या. तर रेणूका सिंह आणि पूजा वस्त्रकार या दोघींना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. आता टीम इंडिया इंग्लंडसमोर किती धावांचं आव्हान ठेवतं याकडे लक्ष असेल.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | स्मृति मंधाना (कॅप्टन) , शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ति शर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), स्नेह राणा, शुभा सतीश, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकुर सिंह आणि राजेश्वरी गायकवाड.

इंग्लंड क्रिकेट टीम | हीथर नाइट (कर्णधार), टॅमी ब्यूमोंट, सोफिया डंकले, नेट सायवर-ब्रंट, डेनिएल व्याट, एमी जोन्स (विकेटकीपर), सोफी एक्लेस्टोन, चार्लोट डीन, केट क्रॉस, लॉरेन फाइलर आणि लॉरेन बेल.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.