IND vs SA 1st Odi: स्मृती मंधाना संकटमोचक, शतकी खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेसमोर 266 धावांचं लक्ष्य
WIND vs WSA 1st Odi: दक्षिण आफ्रिकेसमोर पहिल्या सामन्यात विजयासाठी 266 धावांचं आव्हान आहे. टीम इंडिया विजयी सुरुवात करणार का?

टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मंधाना हीने केलेल्या शतकी खेळीमुळे पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर 266 धावांचा आव्हान ठेवता आलं आहे. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 265 धावांपर्यंत मजल मारली. टॉस जिंकून बॅटिंगसाठी आलेल्या टीम इंडियाने ठराविक अंतराने झटपट विकेट्स गमावल्या. मात्र सलामीवीर स्मृतीने एक बाजू लावून धरत दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्राकर यांच्यासह टीम इंडियाचा डाव सावरला. स्मृतीने शतक ठोकलं. त्यामुळे टीम इंडियाला 250 पार मजल मारता आली. आता फलंदाजांनंतर भारतीय गोलंदाजांची कसोटी असणार आहे. टीम इंडियाचे गोलंदाज 265 धावांचा बचाव करणार का? याकडे साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
टीम इंडिया कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय फसला. शफाली वर्मा 7, हेमलथा 12, हरमनप्रीत कौर 10, जेमिमाह रॉड्रिग्स 17 आणि रिचा घोष 3 धावांवर आऊट झाली. त्यामुळे टीम इंडियाची स्थिती 5 बाद 99 अशी झाली. मात्र स्मृतीने एक बाजू लावून धरली होती. स्मृतीने 5 विकेट्स गेल्यानंतर दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्राकर या दोघींसह निर्णायक भागीदारी केली. स्मृतीने या दरम्यान शतकही ठोकलं आणि टीम इंडियाला सावरलं.
स्मृती आणि दीप्ती या दोघींनी सहाव्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली. दीप्तीने 37 धावांची खेळी केली. तर सातव्या विकेटसाठी स्मृती आणि पूजा वस्त्राकर या जोडीने 58 जोडल्या. स्मृतीने 127 बॉलमध्ये 12 चौकार आणि 1 षटाकाराच्या मदतीने 117 धावांची खेळी केली. राधा यादव 6 धावा करुन मैदानाबाहेर गेली. तर पूजा वस्त्राकर 31 धावांवर नाबाद राहिली. तसेच आशा शोभनाने नॉट आऊट 8 रन्स केल्या.
स्मृतीचं शतक, दीप्ती-पूजाची निर्णायक खेळी
Innings Break!
A solid batting performance from #TeamIndia to post 265/8 on the board! 👌 👌
1⃣1⃣7⃣ for @mandhana_smriti 3⃣7⃣ for @Deepti_Sharma06 3⃣1⃣* for @Vastrakarp25
Over to our bowlers now! 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/EbYe44lnkQ #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/QHmsuyYtEa
— BCCI Women (@BCCIWomen) June 16, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, दयालन हेमलता, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, आशा शोभना आणि रेणुका ठाकूर सिंग.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन: लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, अनेके बॉश, सुने लुस, मारिझान कॅप, ॲनेरी डेर्कसेन, नॉन्डुमिसो शांगासे, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), मसाबता क्लास, नॉनकुलुलेको मलाबा आणि अयाबोंगा खाका.
