AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Harmanpreet Kaur | हरमनप्रीत कौर हीला आयसीसीचा मोठा झटका, नक्की काय केलं पाहा?

Icc On Harmanpreet Kaur | हरमनप्रीत कौर हीने बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवलीय सामन्यात मोठा राडा केला होता.

Harmanpreet Kaur | हरमनप्रीत कौर हीला आयसीसीचा मोठा झटका, नक्की काय केलं पाहा?
| Updated on: Jul 25, 2023 | 5:50 PM
Share

मुंबई | वूमन्स टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात राडा केला. हरमनप्रीत कौर हीला अंपायरने बाद दिल्याचा निर्णय पटला नाही. त्यामुळे हरमनप्रीतने नाराजी व्यक्त केली. इतकंच नाही, हरमनप्रीतने स्टंपवर बॅट मारत आपला राग व्यक्त केला. त्यानंतर सामना टाय झाल्यानंतर ट्रॉफी स्वीकारताना हरमनप्रीतने अंपायरला बोलवा, असंही म्हटलं. हरमनप्रीतला तीचं ही वागणूक चांगलीच महागात पडली. आयसीसने हरमनप्रीतला सामन्याच्या एकूण मानधनाच्या 75 टक्के रक्कम दंड म्हणून ठोठवण्यात आली.

हरमनप्रीतला भडकायला असं झालं तरी काय?

या 3 सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशने विजयी सलामी दिली. तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवत मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. त्यामुळे तिसरा आणि अंतिम सामना हा मालिकेच्या दृष्टीने निर्णायक होता.

या तिसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात टीम इंडियाची बॅटिंग सुरु होती. बांगलादेशने टीम इंडियाला विजयासाठी 226 धावांचं आव्हान दिलं. विजयी आव्हानाचं पाठलाग करताना टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात झाली. टीम इंडियाने झटपट 2 विकेट्स गमावल्या. त्यानंतर हर्लीन देओल आणि स्मृती मंधाना या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी केली. स्मृेती 59 रन्स करुन बाद झाली.

त्यानंतर हरमनप्रीत आणि हर्लीन या दोघींनी मोठ्या भागीदारीच्या दिशेने सुरुवात केली. नाहिदा अख्तर सामन्यातील 34 वी ओव्हर टाकायला आली. या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर हरमनप्रीत कॅच आऊट असल्याचा निर्णय अंपायरने दिला.

अंपायरने दिलेला निर्णय हरमनप्रीतला पटला नाही. रिप्लेमध्ये पाहिल्यानंतर बॉल बॅटला न लागता पॅडला लागल्याचं म्हटलं जात होतं. त्यामुळे हरमनप्रीतने स्टंपवर बॅट मारत राग व्यक्त केला. त्यानंतर हरमनप्रीतवर आयसीसीने कारवाई केली. आता त्यानंतर आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

आयसीसी वूमन्स बॅटिंग रँकिंग

आयसीसी वूमन्स वनडे बॅटिंग रँकिग जाहीर केलीय. यामध्ये हरमनप्रीतला आयसीसीने झटका दिलाय. हरमनप्रीतला 2 स्थानांचं नुकसान झालंय. हरमनप्रीतची सहाव्या क्रमांकावरुन आठव्या स्थानी घसरण झालीय. तर स्मृती मंधाना हीला फायदा झालाय. स्मृतीने सातव्या क्रमांकावरुन सहाव्या स्थानी आहे. दरम्यान टीम इंडियाकडून बॅटिंग रँकिंगमध्ये स्मृती आणि हरमनप्रीत या दोघीच टॉप 10 मध्ये आहेत.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.