AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वनडे वर्ल्डकप स्पर्धा स्वस्तात पाहण्याची संधी, मोबाईल रिचार्जपेक्षा स्वस्त तिकीट! जाणून घ्या

महिला वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेसाठी तिकीट विक्री सुरु झाली आहे. तुम्हालाही वनडे वर्ल्डकप स्पर्धा मैदानात उपस्थित राहून पाहण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण या स्पर्धेसाठी तिकीट मोबाईल रिचार्जपेक्षा स्वस्त आहेत.

वनडे वर्ल्डकप स्पर्धा स्वस्तात पाहण्याची संधी, मोबाईल रिचार्जपेक्षा स्वस्त तिकीट! जाणून घ्या
वनडे वर्ल्डकप स्पर्धा स्वस्तात पाहण्याची संधी, मोबाईल रिचार्जपेक्षा स्वस्त तिकीट! जाणून घ्याImage Credit source: ICC
| Updated on: Sep 05, 2025 | 5:55 PM
Share

महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धेला याच महिन्यात सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघांनी कंबर कसली आहे. तर भारतीय महिला संघही पहिल्या जेतेपदासाठी जोरदार तयारी करत आहे. या स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. अशा स्थितीत भारतीय संघाचं मैदानात उपस्थित राहून मनोबल वाढवण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. 30 सप्टेंबर भारत श्रीलंका या सामन्यापासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी 4 सप्टेंबरपासून तिकीट विक्री सुरू झाली आहे. भारत सरकारने आयपीएल तिकिटांवर वस्तू आणि सेवा कर 28 टक्क्यांवरून 40 टक्के वाढवण्याच्या निर्णयामुळे चाहत्यांसाठी पुढील हंगामापासून थेट सामना पाहणे महाग झाले आहे. पण महिला क्रिकेटबाबत ही चित्र उलट आहे. तुम्हाला या स्पर्धेसाठी तिकीटाचे दर मोबाईल रिचार्जपेक्षा स्वस्त आहेत. मोबाईल रिचार्जसाठी तुम्हाला महिन्यासाठी 249 रुपये खर्च करावे लागतात. पण महिला विश्वचषक मैदानात उपस्थित राहून पाहण्यासाठी त्याहून कमी पैसे खर्च करावे लागणार आहेत. कारण चार दिवसांच्या प्री-सेल विंडोमध्ये तिकीटे खूपच स्वस्त दरात विकली जात आहे.

महिला वर्ल्डकपची तिकीट फक्त 1.14 अमेरिकन डॉलर्स आहे. म्हणजेच भारतीय रुपयानुसार त्याची किंमत फक्त 100 रुपये आहे. त्यामुळे आतापर्यंत क्रिकेट इतिहासाथील सर्वात स्वस्त आयसीसी स्पर्धा ठरली आहे. यापूर्वी आयसीसीची तिकीटं इतक्या स्वस्त दरात कधीच विकली गेली नाहीत. वनडे वर्ल्डकप स्पर्धा 2022 मध्ये न्यूझीलंडमध्ये पार पडली. यावेळी या स्पर्धेचं तिकीट हे मुलांसाठी 7 न्यूझीलंड डॉलर, तर प्रौढांसाठी 17 न्यूझीलंड डॉलर होती. म्हणजेच मुलांसाठी 350 रुपये आणि पौढांसाठी 850 रुपये इतकी होती. त्या तुलनेत ही किंमत खूपच कमी आहे.

महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं हे 13वं पर्व आहे. या स्पर्धेवर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा वरचष्मा राहिला आहे. तर एकदा न्यूझीलंडने जेतेपद जिंकला आहे. आयसीसीने महिला विश्वचषक स्पर्धेच्या बक्षिसाची रक्कम वाढवली आहे. विजेत्या संघाला 13.88 दशल अमेरिकन डॉलर्स मिळणार आहेत. या स्पर्धेत भारत, श्रीलंका, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बांग्लादेश, इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका यांचा समावेश आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.