WPL 2023 : DC vs RCB पहिल्या लढतीत कोण मारणार बाजी?, ‘हे’ 5 खेळाडू ठरवणार रिझल्ट

WPL 2023 : वूमन्स प्रीमियर लीगमध्ये रविवारी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये सामना होणार आहे. या मॅचमध्ये अनेक दिग्गज खेळाडू खेळताना दिसतील.

WPL 2023 : DC vs RCB पहिल्या लढतीत कोण मारणार बाजी?, 'हे' 5 खेळाडू ठरवणार रिझल्ट
Wpl 2023Image Credit source: DC Twitter
Follow us
| Updated on: Mar 05, 2023 | 7:56 AM

WPL 2023 DC vs RCB : आयपीएलच्या धर्तीवर वूमन्स प्रीमियर लीग टुर्नामेंटला सुरुवात झाली आहे. काल पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सवर शानदार विजय मिळवला. मुंबईने गुजराला 143 धावांच्या फरकाने पराभूत केलं. आज रविवारी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये सामना होणार आहे. या मॅचमध्ये फॅन्सना, एक-दोन नाही, तर पाच स्टार आंतरराष्ट्रीय खेळाडूंना पाहण्याची संधी मिळणार आहे. हे खेळाडूच मॅचची दिशा निश्चित करतील. स्मृती मांधना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची कॅप्टन आहे. महिला प्रीमियर लीगच्या ऑक्शनमधील ती सर्वात महागडी खेळाडू आहे. बँगोलरच्या टीमने 3.4 कोटी रुपये मोजून मांधनला विकत घेतलय.

पाच आयसीसी ट्रॉफी जिंकणारी ती एकमेव कॅप्टन

क्रिकेट विश्वात स्मृती मांधना स्फोटक फलंदाज म्हणून ओळखली जाते. तिला रोखणं दिल्ली कॅपिटल्सच्या टीमसाठी सोपं नसेल. दिल्ली कॅपिटल्सच नेतृत्व मेग लेनिंगच्या हातात आहे. पाच आयसीसी ट्रॉफी जिंकणारी ती एकमेव कॅप्टन आहे. तिने बनवलेल्या रणनितीच्या जाळ्यात अनेकदा प्रतिस्पर्धी टीम फसतात. त्याशिवाय लेनिंग बॅटने सुद्धा महत्त्वाचा रोल निभावू शकते. दिल्लीच्या टीममध्ये सुद्धा ती हेच काम करणार आहे.

‘ती’ ऑस्ट्रेलियासाठी 9 टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळली

एलिस पेरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मोठं नाव आहे. ही ऑलराऊंडर खेळाडू ऑस्ट्रेलियासाठी 9 टी 20 वर्ल्ड कप खेळली आहे. आरसीबीने पेरीसाठी 1.7 कोटी रुपये खर्च केले आहेत. 139 टी 20 सामन्यात पेरीने 3386 धावा केल्या आहेत. त्याशिवाय 122 विकेट घेतल्या आहेत. आरसीबी टीममध्ये तिचा रोल महत्त्वाचा असेल.

शेफालीसाठी किती कोटी खर्च केले?

19 वर्षाची शेफाली वर्मा वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन आहे. तिच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला. शेफाली सुद्धा आक्रमक बॅटिंगसाठी ओळखली जाते. तिच्याकडून दिल्ली टीमला भरपूर अपेक्षा असतील. दिल्लीने शेफालीसाठी ऑक्शनमध्ये 2 कोटी रुपये खर्च केलेत. जेमिमा रॉड्रिग्सकडून भरपूर अपेक्षा

दिल्ली कॅपिटल्सने भारताच्या जेमिमा रॉड्रिग्सला उपकर्णधार बनवलय. रॉड्रिग्सला दिल्लीने 2.2 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलय. ही खेळाडू भारताच्या मधल्या फळीतील भरवशाची फलंदाज आहे. अलीकडेच टी 20 वर्ल्ड कपमध्ये तिने शानदार प्रदर्शन केलं होतं. वूमेन्स प्रीमियर लीगमध्ये दिल्लीला तिच्याकडून भरपूर अपेक्षा असतील.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.