AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL 2024, MI vs UPW : युपी वॉरियर्सने नाणेफेकीचा कौल जिंकत निवडली गोलंदाजी, अशी असेल प्लेइंग इलेव्हन

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील सहावा सामना मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्स यांच्यात होत आहे. मुंबईने आतापर्यंत लीगमध्ये खेळलेले दोन सामने जिंकले आहेत. तर युपी वॉरियर्स आपल्या विजयाची आतुरतेने वाट पाहात आहे. त्यामुळे कोण बाजी मारतं? याकडे लक्ष लागून आहे. मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौर हीला आराम देण्यात आला आहे.

WPL 2024, MI vs UPW : युपी वॉरियर्सने नाणेफेकीचा कौल जिंकत निवडली गोलंदाजी, अशी असेल प्लेइंग इलेव्हन
| Updated on: Feb 28, 2024 | 7:14 PM
Share

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्स आमनेसामने आहेत. वुमन्स प्रीमियर लीगच्या मागच्या पर्वात हे दोन संघ तीन वेळा आमनेसामने आले होते. यात दोन सामन्यात मुंबई इंडियन्सने, तर एका सामन्यात युपी वॉरियर्सने बाजी मारली आहे. यंदाच्या स्पर्धेतील सुरुवातीचे सामने पाहता मुंबई इंडियन्सचं पारडं जड दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या पर्वात कोण बाजी मारतं याची उत्सुकता ताणली गेली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पहिल्या पर्वात बाजी मारली होती. आता या वर्षीही प्रबळ दावेदार असल्याचं पहिल्या दोन सामन्यातून दाखवून दिलं आहे. युपी वॉरियर्सला पराभूत करत गुणतालिकेत अव्वल स्थान गाठण्याचा मानस असणार आहे. दरम्यान युपी वॉरियर्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सला मोठी धावसंख्या उभारण्याचं आव्हान असणार आहे. दव फॅक्टर पाहता मुंबई इंडियन्सला विजयासाठी धडपड करावी लागेल हे मात्र निश्चित आहे.

युपी वॉरियर्सची कर्णधार एलिसा हिली म्हणाली की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करू. पहिल्या गेममध्ये आम्ही खूप जवळ आलो होतो. पण दुसऱ्या गेममध्ये हवी तशी कामगिरी झाली नाही. आमच्या संघात एक बदल आहे.” दुसरीकडे नॅट सायव्हर ब्रंट आणि एलिसा हिली यांच्यातील स्पर्धेबाबतही प्रश्न विचारला गेला. तेव्हा तिने सांगितलं की, “हे वुमन्स प्रीमियर लीग आहे. भारत आहे.”

दुसरीकडे, हरमनप्रीत दुखापतीमुळे या सामन्यात खेळणार नसल्याने नॅट सायव्हर ब्रंटकडे कर्णधारपद सोपवलं आहे. नॅट सायव्हर ब्रंट म्हणाली की, “हरमनला दुखापत असल्याने तिला विश्रांती द्यायची होती. शबमीन इस्माईलला दुखापतग्रस्त आहे. हरमनने आमचे चांगले नेतृत्व केले आहे, मी तिच्याकडून थोडेसे शिकले आहे.”

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, अमनजोत कौर, इस्सी वाँग, एस सजना, हुमैरा काझी, कीर्थना बालकृष्णन, सायका इशाक

यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन): एलिसा हिली (विकेटकीपर/कर्णधार), वृंदा दिनेश, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, श्वेता सेहरावत, किरण नवगिरे, पूनम खेमनार, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, अंजली सरवाणी, राजेश्वरी गायकवाड

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.