AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL 2024, RCB vs GG : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने जिंकला नाणेफेकीचा कौल, गोलंदाजी घेत स्मृती मंधाना म्हणाली…

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पहिल्या सामन्यात युपी वॉरियर्सला पराभूत केलं होतं. तर गुजरात जायंट्सला पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे आता या सामन्या कोण बाजी मारणार याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

WPL 2024, RCB vs GG : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने जिंकला नाणेफेकीचा कौल, गोलंदाजी घेत स्मृती मंधाना म्हणाली...
WPL 2024, RCB vs GG : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने टॉस जिंकला, गोलंदाजीच्या निर्णयासह अशी असेल प्लेइंग 11
| Updated on: Feb 27, 2024 | 7:13 PM
Share

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत पाचवा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात जायंट्स यांच्यात होत आहे. स्मृती मंधानाच्या नेतृत्वात बंगळुरुने पहिला सामना जिंकला आहेत. तर गुजरात जायंट्सला आपल्या विजयाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे या सामन्या कोण बाजी मारतं याकडे लक्ष लागून आहे. नाणेफेकीचा कौल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बाजूने लागला. कर्णधार स्मृती मंधानाने गोलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच या निर्णयामागचं तथ्य सांगितलं. स्मृती मंधाना म्हमाली की, “आम्हाला प्रथम क्षेत्ररक्षण करायचे आहे. पहिल्या 5 षटकांमध्ये काहीतरी करणं गरजे आहे. शेवटचा गेम शानदार होता, जवळचे विजय नेहमीच खास असतात. आम्हाला क्रिकेटमध्ये सर्वोत्तम खेळी करायचीआ आहे. पहिला गेम नक्कीच महत्त्वाचा होता पण भूतकाळ विसरून पुढे जाणेही महत्त्वाचे आहे. आम्ही त्या संघासोबत मैदानात उतरणार आहोत.”

प्रथम फलंदाजीचं निमंत्रण मिळाल्यानंतर गुजरात जायंट्सची कर्णधार बेथ मूनी व्यक्त झाली आहे. ” आमच्या इथे-तिथे काही बैठका झाल्या आहेत. या स्पर्धा खूप लवकर होत आहेत. आम्हाला निकाल येण्यापूर्वीच पद्धतीवर विश्वास ठेवायला हवा आणि प्रक्रिया करायला हवी. आमच्याकडे काही जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत, त्यापैकी काहींना मुकावे लागेल पण संधी मिळतील. काहीही बदल नाही.”

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

गुजरात जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): बेथ मुनी (कर्णधार/विकेटकीपर), वेदा कृष्णमूर्ती, हरलीन देओल, फोबी लिचफील्ड, दयालन हेमलता, ॲशलेग गार्डनर, कॅथरीन ब्राइस, स्नेह राणा, तनुजा कंवर, ली ताहुहू, मेघना सिंग.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): सोफी डेव्हाईन, स्मृती मानधना (कर्णधार), सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), जॉर्जिया वेरेहम, सोफी मोलिनक्स, श्रेयंका पाटील, सिमरन बहादूर, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं