WPL 2025 : युपी वॉरियर्सचं दिल्ली समोर विजयासाठी 167 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?
वुमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेतील सहाव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि युपी वॉरियर्स हे संघ आमनेसामने आले आहेत. युपी वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात गडी गमवून 166 धावा केल्या आणि 167 विजयासाठी धावांचं आव्हान दिलं. आता हे आव्हान दिल्ली कॅपिटल्स गाठणार का? याकडे लक्ष लागून आहे.

वुमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेला आता हळूहळू रंग चढू लागला आहे. प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत उलथापालथ होताना दिसत आहे. त्यामुळे विजय मिळवण्यासाठी संघांची धडपड आहे. गतविजेता आरसीबी संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्स चौथ्या, तर युपी वॉरियर्सच्या खात्यात शून्य गुण आहेत. त्यामुळे दोन्ही संघांना गुणतालिकेत छाप सोडण्यासाठी विजय मिळवणं महत्त्वाचं आहे. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खरं तर युपी वॉरियर्सलाही प्रथम गोलंदाजी करायची होती. पण नाणेफेक गमवल्याने भ्रमनिरास झाला. त्यामुळे धावफलकावर मोठी धावसंख्या लावण्याशिवाय पर्याय नव्हता. युपी वॉरियर्सने चांगली सुरुवात केली पण त्यानंतर डाव घसरला. युपी वॉरियर्सने 20 षटकात 7 गडी गमवून 166 धावा केल्या आणि विजयासाठी 167 धावांचं आव्हान दिलं.
युपी वॉरियर्सला किरण नवगिरे आणि वृंदा दिनेश यांनी चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी केली. किरण नवगिरेने 27 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 51 धावा केल्या. पण त्यानंतर घसगुंडी सुरु झाली. कर्णधार दीप्ती शर्मा आणि तहिला मॅकग्राथ स्वस्तात बाद झाले. दीप्तीने 7, तर तहिला मॅकग्राथने 1 धाव करून बाद झाले.
श्वेता शेरावतने त्यानंतर मोर्चा सांभाळला. ग्रेस हॅरिस काही खास करू शकली नाही. श्वेता शेरावतने 33 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 37 धावा करून बाद झाली. तर चिनले हेन्रीने आक्रमक खेळी केली. तिने 15 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने नाबाद 33 धावा केल्या.तिने 14 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 12 धावा करून बाद झाली.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, मेग लॅनिंग (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, मॅरिझाने कॅप, अॅनाबेल सदरलँड, निकी प्रसाद, सारा ब्राइस (विकेटकीपर), जेस जोनासेन, शिखा पांडे, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी.
यूपी वॉरियर्स महिला (प्लेइंग इलेव्हन) : किरण नवगिरे, वृंदा दिनेश, उमा चेत्री (विकेटकीपर), दीप्ती शर्मा (कर्णधार), ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, चिनेल हेन्री, श्वेता सेहरावत, सोफी एक्लेस्टोन, क्रांती गौड, राजेश्वरी गायकवाड.