MIW vs RCBW : मुंबई इंडियन्सला थेट अंतिम फेरी गाठण्याची संधी, नाणेफेकीचा कौल जिंकताच…
वुमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेच्या साखळी फेरीतील शेवटचा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. आरसीबीचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्स हा सामना जिंकून थेट अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे.

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचा गेल्या एक महिन्यांपासून सुरु असलेला थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. साखळी फेरीतील 20वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. हा सामना मुंबई इंडियन्ससाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण या सामन्यातील विजयामुळे मुंबई इंडियन्सला थेट अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. पण या सामन्यात पराभव झाला तर दिल्ली कॅपिटल्सला अंतिम फेरीची संधी मिळेल. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. मात्र या स्पर्धेचा शेवट विजयाने करण्याचा मानस असेल. त्यामुळे हा सामन्याला खऱ्या अर्थाने महत्त्व प्राप्त झालं आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातील सामना होत आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, आम्ही प्रथम गोलंदाजी करू. पाठलाग करणे हा एक चांगला पर्याय आहे. शेवटचा सामना याचे उदाहरण आहे. प्रत्येक सामन्यात आपण विजयाची भूक दाखवली आहे. हा एक महत्त्वाचा सामना आहे.
आरसीबीची कर्णधार स्मृती मंधानाने सांगितलं की, आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण केले असते. जर चांगली धावसंख्या उभारली तर तुम्ही चांगली कामगिरी करू शकता. स्पर्धेच्या सुरुवातीला आम्ही ज्या पद्धतीने सुरुवात केली. आम्हाला आमच्या ब्रँडचे क्रिकेट खेळायचे होते पण आम्ही ते करू शकलो नाही. राणाने ज्या पद्धतीने फलंदाजी केली. ती शानदार होती. रेणुकाचा हंगाम उत्तम गेला. पेरीने चांगली फलंदाजी केली आहे. आमच्याकडे तीन बदल आहेत.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, अमेलिया केर, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमनजोत कौर, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), सजीवन सजना, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, पारुनिका सिसोदिया.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): सभिनेनी मेघना, स्मृती मानधना (कर्णधार), एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), कनिका आहुजा, जॉर्जिया वेरेहम, हेदर ग्रॅहम, स्नेह राणा, किम गर्थ, प्रेमा रावत, जोशिता व्ही.जे.
