AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL 2026 : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेबाबत मोठी अपडेट, या तारखेला लागणार खेळाडूंसाठी बोली!

वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद कोण मिळवणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. असं असताना वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. पुढच्या महिन्यात या स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंसाठी बोली लागण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊयात..

WPL 2026 : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेबाबत मोठी अपडेट, या तारखेला लागणार खेळाडूंसाठी बोली!
WPL 2026 : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेबाबत मोठी अपडेट, या तारखेला लागणार खेळाडूंसाठी बोली!Image Credit source: (Image Credits: BCCI)
| Updated on: Oct 22, 2025 | 5:41 PM
Share

वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेसाठी अवघ्या काही महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. तत्पूर्वी मेगा लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. कारण यंदाचं चौथं वर्ष असून असून आयपीएलप्रमाणे दर तीन वर्षांनी या स्पर्धेसाठी मेगा लिलाव प्रक्रिया असेल असं सांगितलं जात आहे. मिडिया रिपोर्टनुसार मेगा लिलाव प्रक्रिया पुढच्या महिन्यात म्हणजेच 26 किंवा 27 ताखरेला होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ही तारीख 26 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान दिली होती. मात्र आता या तारखेत बदल करत 26 किंना 27 नोव्हेंबर केली आहे. एकाच दिवशी मेगा लिलाव प्रक्रिया पार पडेल असं सांगण्यात येत आहे. दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये मेगा लिलाव होईल असं सांगण्यात येत आहे. यंदा नव्या संघाची एन्ट्री होईल अशी चर्चा होती. मात्र तसं होताना दिसत नाही. त्यामुळे चौथ्या पर्वातही पाच संघच मैदानात उतरतील.  पहिल्या पर्वात मुंबई इंडियन्स, दुसऱ्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि तिसऱ्या पर्वात पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सने बाजी मारली होती.

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, लिलावाची एक तारीख अजूनही निश्चित केलेली नाही. पण लिलाव प्रक्रिया एकाच दिवसात पार पडेल असं सांगण्यात येत आहे. वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत एकूण 5 संघ आहेत. यासाठी फार काही वेळ लागणार नाही. एकाच दिवसात पाचही संघाचे स्कॉड निश्चित केले जातील. जवळपास 90 खेळाडू या मेगा लिलावत भाग घेतील. पण अधिकांश संघ खेळाडू रिटेन करतील असंच चित्र दिसत आहे. सर्व 5 फ्रेंचायझींना रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी 5 नोव्हेंबरपर्यंत सोपवायची आहे.

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या रिटेन्शन बाबतचे नियम जाहीर करण्यात आले आहेत. प्रत्येक संघाला लिलावासाठी 15 कोटींची रक्कम मिळणार आहे. यात पहिल्या स्थानावर असलेल्या खेळाडूला 3.5 कोटी, दुसऱ्या स्थानावरील खेळाडूला 2.5 कोटी, तिसऱ्या स्थानावरील खेळाडूला 1.75 कोटी, चौथ्या स्थानावरील खेळाडूला 1 कोटी आणि पाचव्या स्थानावरील खेळाडूला 50 लाख रुपये मिळतील. म्हणजेच पाच खेळाडू रिटेन केले तर 9.25 कोटी खर्च होतील. इतर खेळाडू घेण्यासाठी फ्रेंचायझीकडे 5.75 कोटी रुपये उरतील. आता फ्रेंचायझी कोणते प्लेयर्स रिटेन करते आणि कोणाला रिलीज करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्यात लिलावात पहिल्याचा राइट टू मॅच कार्डही वापरता येणार आहे.

मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.